पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची महिन्या भरात ना.रावसाहेब पाटील दानवे ह्यांच्या सोशल मीडिया वरील दोन पोस्टची दखल

49

जालना | प्रतिनिधी –  केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे हे नेहमीच आपल्या लोकाभिमुख कार्यासाठी जाणले जातात. समाजातील सर्व घटकांना एकत्रीत पुढे घेऊन जाण्यात ते विश्वास ठेवतात. भारतात सध्या मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी अनेक ठिकाणी टप्याटप्याने वंदे भारत ट्रेन चा शुभारंभ करत आहेत. अत्यंत सुरक्षित, आरामदायक आणि सेमी हाय स्पीड ह्या मूलभूत तत्वांवर चालणाऱ्या ह्या ट्रेनचे देशभर कौतुक होताना पाहायला मिळत आहे. मोदी सरकार महिला सशक्तीकरणाची अत्यंत गंभीरपणे दखल घेत आहे. मोदीजींच्या टीम मधील सर्वच मंत्री देखील ह्या कार्यात पुढे आहेत.

ह्याच वंदे भारत च्या लोको पायलट सुरेखा यादव ह्यांच्या विषयी ची पोस्ट केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील पाटील दानवे ह्यांनी ट्विटरवर पोस्ट केली होती ज्यात त्यांनी सुरेखा यादव ह्यांचे कौतुक केले होते. हीच पोस्ट मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी ह्यांनी रिपोस्ट करत महिलांचे देशाच्या प्रगतीत किती महत्वाचे स्थान आहे हे सांगितले आहे. दानवे ह्यांनी शेयर केलेला सुरेखा यादव ह्यांचा फोटो हा मुंबई ते सोलापूर वंदे भारत चालवितानाचा आहे. सुरेखा यादव ह्या आशियातील पहिल्या लोको पायलट आहेत.

ना.दानवे ह्यांची ही पोस्ट अत्यंत व्हायरल होत आहे. एकाच महिन्याच्या अंतरात दानवे ह्यांच्या ट्विटर वरील 2 पोस्ट मा.पंतप्रधान ह्यांनी रिट्विट करणं हे अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी दानवे ह्यांनी 30 बंद पडलेल्या खाणी ह्या आता इको-टूरिजम अंतर्गत सुरू करण्यात आल्या आहेत ही पोस्ट शेयर केली होती. खुद्द पंतप्रधान ह्याची दखल घेत आहेत हा दानवे ह्यांच्या कार्याचा एका प्रकारे गौरवच आहे.