जालना- एकच मिशन जुनी पेन्शन म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारत राज्यभरात संप पुकारला आहे. जालन्यात देखील या संपाला जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
या संपा दरम्यान आज शुक्रवारी(दि. 17) रोजी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पेन्शनच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हा सामान्य रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्च्यात रिपब्लिक इम्पोलाय फेडरेशनच्या विभाग प्रमुख अनिता भालतिलक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व तृतीय व चतुर्थ कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्च्याचा समारोप करण्यात आला.