जालना – स्वातंत्र्यसंग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृध्दींगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र, जालना द्वारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन 21 मार्च 2023 रोजी करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम औद्योगीक प्रशिक्षण संस्था, जालना येथे सकाळी 10.00 ते 5.00 या कालावधीत आहे. या उत्सवात चित्रकला कार्यशाळा स्पर्धा, कविता लेखन कार्यशाळा स्पर्धा, छायाचित्र कार्यशाळा स्पर्धा, जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा व बक्षीसाचे स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1) चित्रकला, 2) कविता लेखन व 3) छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा :- (बक्षीस :- प्रथम रु. 1000/-, व्दितीय रु.750/- तृतीय रु.500/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र )
जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा :- (बक्षीस :- प्रथम रु.5000/-, व्दितीय रु.2000/- तृतीय रु.1000/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र)
जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम (समूहाकरीता) : एका ग्रुप मध्ये कमीत कमी 5 जास्तीत जास्त 10 स्पर्धक
( समूहनृत्य बक्षीस : प्रथम रु. 5000/-,व्दितीय रु.2500/-तृतीय रु.1250/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
तरी या जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी पुढील लिंकवर http://shorturl.at/mpCG9 दिनांक 20 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. ज्या सहभागीनी अगोदर नोंदणी केलेली आहे त्यांना नोंदणी करण्याची गरज नाही. अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र, विशाल बिल्डींग, औरंगाबाद चौफुली, जालना- 431203 फोन नं. 02482-220118 ईमेल : qnykjalna@gmail.com वर संपर्क साधावा. जिल्हातील तरुण युवा कलावंतांनी या
कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रणित सांगवीकर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र जालना यांनी केले आहे.