शासकीय गुत्तेदार एम.पी. पवार मृत्यू प्रकरणी चौकशीची जिल्हा कॉन्ट्रक्टर असो.ची मागणी

24

जालना । प्रतिनिधी – नगर परिषद अंतर्गत शासकीय कंत्राटदार एम. पी. पवार यांचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला. सदरील मृत्यू प्रकरणाची पोलीस यंत्रणेमार्फत विशेष पथक नेमून सखोल चौकशी करून संशयास्पद मृत्यू मागचे सत्य उजेडात आणावे, एम.पी.पवार यांचे मागील दोन वर्षांपूर्वीचे सी डी आर. तपासावे व या प्रकरणात दोषी आढळून येणार्‍यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी. अशी मागणी जालना जिल्हा कंत्राटदार असोशिएशनच्या वतीने एका निवेदनाद्वारे केली आहे.
एम.पी.पवार यांचा घाणेवाडी जलाशयात मृतदेह आढळला होता. घटनास्थळी विषाची बाटल सुध्दा सापडली होती त्यावरून शहरात एकच खळबळ ऊडाली. या प्रकरणी नागरीकांमध्ये तर्कवितर्क लावल्या जात आहे.
सदरील निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तसेच पोलीस आधीक्षक यांना पाठविण्यात आली.
दिलेल्या निवेदनावर बी. एम. दानवे, कारमती वाघ, व्ही. पी. साथी, हिंमतराव शिंदे, अमित देशमुख, सय्यद सलीम, श्रीकांत घुले, धनराज लोंढे पाटील, बी. एन उढाण, सागर बर्दापूरकर, रामप्रसाद काकडे, आर. आर. खांडके, संदीप हिमाले, सुरेश रत्न पारखे, मंगेश गडवे, स्वप्नील गायकवाड, चेतन व्यास, महेंद्र शिंदे, सय्यद अजीम ई. च्या स्वाक्षर्‍या आहेत.