जी-२० निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला उद्यापासून सुरुवात; स्पर्धेतील विजेत्यांचाही होणार गौरव

24

नागपूर  – जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन उद्या, शुक्रवार दि. 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. जी-20 निमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचाही यावेळी गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. दि. 17 ते 24 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी निःशुल्क खुले असणार आहे. झिरो माईलजवळील जिल्हा मध्यवर्ती संग्रहालयात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील दर्जेदार छायाचित्रे यावेळी पहायला मिळणार आहे. नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन आणि जिल्हा मध्यवर्ती संग्रहालय यांचे विशेष सहकार्य या प्रदर्शन आयोजनासाठी मिळाले आहे.