जालना | प्रतिनिधी – जालना जिल्हयातील पिक विमा भरलेल्या व पिक विमा कंपनीकडे तक्रार दाखल न केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम देण्याची मागणी बदनापूर-अंबड विधानसभेचे आ.नारायणराव कुचे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. मुंबई येथे चालु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदनापूर-अंबड चे आमदार नारायण कुचे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना एच.डी.एफ.सीच्या विमा कंपनीकडे पिक विमा भरलेला आहे व शेतकऱ्यांना एच.डी.एफ.सीच्या विमा कंपनीच्या माध्यामातून पिक विमा देण्यात येतो परंतु जालना जिल्हयामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला व पिक विमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या आहेत अशा शेतकऱ्यांनाच पिक विमा मिळाला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला व त्यांचे शेतातील नुकसान सुदधा मोठया प्रमाणात झाले आहे परंतु काही अडचणीमुळे पिकविमा कंपनीकडे तक्रारी दाखल केलेल्या नाहीत अशा जालना जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपनींने पिक विमा दिलेला नसल्यामुळे अशा पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यावर अन्याय झाला असून पिक विमा कंपनीविरुध्द शेतकऱ्यांचा मोठया प्रमाणात असंतोष पसरला आहे. तरी याबाबत शासनाने तात्काळ दखल घेवून पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिकविमा देण्यासाठी संबधीत पिकविमा कंपनीस निर्देश देण्याची मागणी आ.नारायण कुचे यांनी आज विधानसभेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे.