कुंभार पिंपळगाव-आष्टी रस्त्यावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर एक जण  गंभीर जखमी   

302
आष्टी- आष्टी ते कुंभार पिंपळगाव रोडवर स्कुटीवर जात असताना उभा असलेल्या ट्रकच्या ट्रालीला मागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. यात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी पडला आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, ढोणवाडी ता.परतूर येथील गणेश सुरेश पाटील (वय 24) व अजय सुरेश पाटील (वय 18) यांचे आष्टी येथे ‘पाटील कलेक्शन ‘ दुकान आहे. मुळ गाव असलेल्या ढोणवाडी ते आष्टी येथे ८ किलो मिटर  अंतरावर दररोज व्यवसाय जाने-येणे सुरु होते. नेहमी प्रमाणे गुरुवार (दि. १६) सकाळी ८ च्या दरम्यान ढोणवाडी वरून स्कुटीवर निघाले असता कुंभार पिंपळगाव ते आष्टी  दरम्यान राज्य महामार्ग वर उभ्या असलेल्या ट्रकच्या ट्रालीला धडक बसून झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. या मध्ये अजय पाटील व गणेश पाटीलच्या डोक्याला जबर मार लागल्याने आष्टी येथे प्राथमिक उपचार नंतर जालना येथे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान अजय सुरेश पाटीलचा मृत्यू झाला आहे. अजयच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .