दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी अभियान नगरपरिषद जालना च्या वतीने महिला मेळावा संपन्न

19

जालना । प्रतिनिधी –8 मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून दिनांक 14 मार्च 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह टाउनहॉल जालना येथे दीनदयाल अंत्योदय योजना स्थापित जालना, नगरपरिषद जालना, अंतर्गत महिला स्वयं सहाय्यता बचत गटांचा महिला मेळावा संपन्न झाला यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर अधिकारी महिलांनी बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले यावेळी नगरपरिषद जालना आरोग्य अधिकारी डॉ राजे मॅडम महिला व बालविकास अधिकारी आर एम चिमिंद्रे मॅडम नगरपरिषद सी ओ संतोष खांडेकर एड. कल्पना त्रिभुवन सामाजिक सेविका संचालिका सौ वैशाली सरदार मॅडम आरटीओ इन्स्पेक्टर प्रियंका छडीदार बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी तावडे सर कुलकर्णी सर यांनी सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले मेळाव्याचे आयोजन दामिनी शहर स्तर संघ जालना च्या वतीने करण्यात आले होते हा मेळावा यशस्वी करण्यासाठी दामिनी शहर संघाच्या अध्यक्ष सौ द्वारकाबाई छडीदार सचिव सौ सविताताई किवंडे सौ इंदुबाई मांदळे सौ वंदना दाभाडे सौ रेखा बोराडे सौ सुजाता काकडे प्रकल्प अधिकारी सांगळे सर एडवोकेट अमित डाके सर विलास खरात अशा गाडे अनिता चंद्रहास सोन चिरैया शहरी उपजीविकाचे व्यवस्थापक सागर जाधव सर नम्रता खोले मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले मेळावा चे प्रास्ताविक सविता किवंडे यांनी केले तर सूत्रसंचालन नम्रता खोले यांनी केले आभार द्वारकाबाई छडीदार यांनी मानले