डॉ. गिरीश पाकणीकर यांचा विवेकानंद हॉस्पिटलमध्ये सत्कार

29

जालना | प्रतिनिधी – लॉयन्स इंटरनॅशनलच्या 3234 एच – 2 च्या जालन्यात पार पडलेल्या शिखर विभागीय परिषदेत प्रांतातील बेस्ट ट्रेझरर म्हणून लॉयन्स क्लब ऑफ जालनाचे कोषाध्यक्ष लॉ. गिरीश पाकणीकर यांचा विवेकानंद हॉस्पिटलधील डॉक्टर्स आणि कर्मचार्या तफ्रे सत्कार करण्यात आला.
यावेळी बंडू इघारे, मुकेश जगधने, प्रकाश कसबे, समाधान पाटोळे, संदीप शिंदे, अविनाश खादरे, अतुल कांबळे, डॉ. शेलगावकर ,अशोक नरवडे आदीत्य कांबले आदींची उपस्थिती होती.
डॉ. पाकणीकर हे गेल्या 20 वर्षापासून लायन्स क्लबमध्ये कार्यरत आहेत. क्लबच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या विविध सेवा आणि आरोग्यविषयक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या रविवारी लायन्स क्लबच्यावतीने घेतल्या जाणार्‍या मोफत मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबीराच्या आयोजनात ते गेल्या 6 वर्षापासून सातत्याने कार्य करत आहेत. यावर्षी ते जालना लायन्स क्लबचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असून, त्यांच्या कार्याची प्रांतस्तरावर दखल घेण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. पाकणीकर म्हणाले की, लायन्स क्लबच्या माध्यमातून गरजूंची सेवा करण्याची संधी मिळते हे मी माझे भाग्य समजतो. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी अधिकच वाढली आहे. पदाधिकारी आणि सदस्यांच्या सहकार्याने यापुढेही यापेक्षा अधिक जोमाने काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.