दिंडी मार्गावरील सावंगी गंगा व श्रीष्टी पुलाच्या कामावरून आमदार बबनराव लोणीकरांनी विधानसभेत केला प्रश्न उपस्थित; मंत्री शंभूराज देसाई यांचे अधीक्षक अभियंता यांची चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे आश्वासन

26
राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करत शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील श्रीष्टी ता परतुर व गंगासांगी ता परतुर येथील, चारशे किलोमीटर शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग पूर्ण होऊनही या फुलांचे काम का रखडले यावरून मेघा कंपनी व रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर काय कार्यवाही करणार असा प्रश्न उपस्थित केला
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की गोदावरी नदी ही राष्ट्रीय संपत्ती असून, नदीपात्रातील पुलाचे काम करण्यास कंत्राटदार कंपनीला कुठलीही अडचण नव्हती यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांच्या सोबत वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका झाल्या मात्र कार्यकारी अभियंतांनी कंपनीला पाठीशी घालण्याचा सतत प्रयत्न केल्यामुळे हे काम होऊ शकले नाही दोन्ही बाजूच्या भरावासाठी दहा एकर जमीन संपादनाची आवश्यकता आहे मात्र अद्यापही ते झालेले नाही, तर श्रीष्टी येथील पुलाच्या संदर्भामध्ये बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील या पुलाचे काम पूर्ण असल्यामुळे या ठिकाणाहून जुन्या पुलावरून जाताना एक एसटी बस पुराच्या पाण्यात वाहून जाता जाता बचावली त्यामध्ये 23 प्रवासी गावकऱ्यांच्या मदतीमुळे सुखरूप वाचले नसता मोठा अनर्थ झाला असता, श्रीष्टी येथील पुलाच्या बांधकामा संदर्भामध्ये बोलताना ते पुढे म्हणाले की केवळ एक एकर भूसंपादनासाठी हा पूल गेल्या पाच वर्षापासून पूर्ण करण्यात आलेला नसून यासंदर्भामध्ये कंपनी व कार्यकारी अभियंत्यावर काय कार्यवाही केली जाईल असा सवाल यावेळी विधान भावना त्यांनी  उपस्थित केला
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाली की कार्यकारी अभियंता यांनी हे प्रकरण कोर्टात चालू असल्याची खोटी माहिती दिली असून याबाबत कुठल्या प्रकारची कारवाई सरकार करणार आहे अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला
यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तरा दाखल असे सांगितले की केंद्र सरकारकडे या गोष्टीचा प्रस्ताव दाखला असून याचा पाठपुरावा राज्य सरकार करीत असून यासंदर्भात लवकरच निर्णय होईल मात्र कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता व कंत्राटदार कंपनी यांनी जर याबाबतीत दिरंगाई केली असेल तर निश्चितपणे अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून कारवाई केली जाईल असे आश्वासन या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले