रिपब्लिकन सेनेची शुक्रवारी महत्वाची बैठक

13

जालना | प्रतिनिधी – सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या  आदेशानुसार आणि महाराष्ट्र अध्यक्ष सागर डबरासे यांच्या सुचनेवरून जालना जिल्हा रिपब्लिकन सेनेची महत्वाची बैठक शुक्रवार दि. 17 मार्च रोजी औद्योगीक वसाहत संभाजीनगर रोड एनआरबी कंपनीच्या बाजूला पक्ष कार्यालय येथे होणार आहे.
सदर बैठकीमध्ये आगामी काळात होणाऱ्या नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या कापसाला दर वाढ आणि परभणी येथे दि. 25 मार्च रोजी होणाऱ्या रिपब्लिकन सेनेचा स्वाभीमानी मेळाव्यासाठीच्या पुर्वतयारी निमित्त सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व जिल्हा, युवक, महिला आघाडी, कामगार आघाडी, तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  प. जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, पु. जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने, महासचिव एक्स आर्मी चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्रआप्पा खरात आदींनी केले आहे.