विरेगाव | प्रतिनिधी – जालना तालुक्यातील हिवडी येथे दि.१५.३.२०२३ बुधवार ते १९ मार्च पंचदिनीय अखंड हरिनाम व पारायण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले .या सप्ताहात दैनंदिन पहाटे काकड ,आरती विष्णू सहस्त्रनाम ,गाथा भजन, हरिपाठ, हरी किर्तन पारायण होणार आहे .तसेच सप्ताह ह भ प अध्यात्मरत्न अनिरुद्ध महाराज शिरसागर ,ह भ प पांडुरंग महाराज वाघमारे, हभप भागवताचार्य पंकज महाराज थोरे ह भ प रामकृष्ण महाराज शास्त्री यांचे हरिकीर्तन होणार आहे. तर रविवार दिनांक 19 रोजी सकाळी ह भ प विष्णू महाराज क्षीरसागर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे .व नंतर महाप्रसादने या सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी किर्तन श्रावणांचा व महाप्रसादांचा लाभ घ्यावा ,अशी आव्हान ग्रामस्थ व संयोजकांच्या वतीने करण्यात आले.