माणसातच देव माननारे स्व. उत्तमराव गायकवाड यांचे आरोग्य सेवेत मोठे योगदान! श्रद्धांजलीपर कार्यक्रमात उपस्थित्यांचे मनोगत

33

जाफराबाद । प्रतिनिधी – जाफ्राबाद तालुक्यांतील माहोरा येथील कुठलाही जात धर्म चा विचार न करता रुग्णांची सेवा हिच ईश्वर सेवा केलेल्या डॉ.उत्तमराव एल. गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले. सर्वत्र परिचित असल्याने डॉ. गायकवाड कुंटुंबाना दुःख पेलण्यांची ताकद देवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. गायकवाड हे जरी पेशाने डॉक्टर असले तरी त्या पलीकडे मानव रूग्णांची व गोरगरिबांची सेवा करण्याकरिता माजी आमदार स्व . रंगनाथराव पाटील यांच्या माध्यमातुन रुग्णाची सेवा करण्या साठी प्रा.आ. केंद्र माहोरा सुरू करण्या मध्ये फार मोठे योगदान आहे. खर्‍या अर्थाने माणसातच देव डॉ. गायकवाड यांनी ओळखला असे मत जेष्ठ भाजपा चे नेते भगवान लहाने यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना व्यक्त केले असुन गावागावात जाऊन , प्रा.आ. केंन्द्र साठी ग्राम निधी त्यांनी जमा केलेला आहे असेही लहाने पाटील यांनी शेवटी बोलतांना सांगितले. या वेळी भाजापाचे जेष्ठ नेते माजी जि.प. सदस्य गणेशराव डुकरे , जि. म.स. बँकेचे संचालक भाऊसाहेब पा.जाधव , विजय पा.कड , अन्ना पाटील इंगळे , माजी सभापती चंद्रकांत चौतमोल , ग्रा.प. सदस्य भास्कर दादा सोनुने, आदीने डॉ. गायकवाड , यांनी केलेले समाज सेवेचे कार्य बद्दल प्रकाश टाकला , कार्यकमाचे सुत्रसंचालन दादाराव गडकरी ,यांनी केले तर कार्यक्रमास उपस्थित उपसरपंच सैय्यद हबीब सैय्यद कमाल ,जेष्ठ वामनराव लहाने , ग्रा.प. सदस्य बाबासाहेब बोरसे , बी .डी. गव्हले, भानुदास बोर्डे , हर्षल जाधव , चंदु सिरसाठ , कैलास लहाने ,सुखदेव साबळे , दत्ता शहागडकर , माजी उपसरपंच दिपक लहाने , दादाराव जंजाळ ,अनिल विठ्ठल देशमुख , गणेश सुरडकर , सांडु पा. जाधव , सोमनाथ चौधरी , अनिल साळवे , गणेशराव लहाने , संतोष गौरकर , बाबु साबळे , अनिल साळवे , बाबुराव लहाने , विठ्ठल काकडे , संतोष वरपे ,लश्मण इंगळे , भिका सिरसाठ , भिमराव बोर्डे , विलास लहाने , दिलीप तोंडे , गुलाब सैय्यद , शेख ईनुस ,पवन लहाने , गुलाब कळम,जिवन लहाने,संतोष बोर्डे , गणेश पगारे , गणेश गायकवाड , आदानी उपस्थित राहुन डॉ. गायकवाड यांना श्रध्दाजंली अर्पण केली.