जालना – एकच मिशन जुनी पेन्शन म्हणत आज सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारत राज्यभरात संप पुकारला. जालन्यात देखील या संपाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या संपा दरम्यान कर्मचाऱ्यांनी पेन्शनच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला. गांधी चमन येथून मोर्च्याला सुरुवात झाली. गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालय जालना पर्यंत विराट पायी महामोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चास अंदाजे 5 ते 6 हजार कर्मचाऱ्यांसह शिक्षक बंधु भगिनी सहभागी झाले होते. मोर्चा शनी मंदिर, नूतन वसाहत मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले. या दरम्यान कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पेन्शन देण्याची मागणी लावून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.या मोर्चात सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. कहातात झेंडे आणि बॅनर घेऊन कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चामुळे अनेकांची धावपळ उडाली.
जुन्या पेन्शन योजनेनुसार शासकीय नोकरी केल्यानंतर कर्मचाऱ्याला 50% पेन्शन मिळते तसेच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला शाश्वती मिळते. परंतु 1 नोव्हेंबर 2005 पासून लागू केलेल्या नवीन पेन्शन नुसार कर्मचाऱ्याच्या पगारातून दहा टक्के कपात केली जाते तसेच शासनाकडून 14% असा निधी जमा करून शेअर्स मार्केटमध्ये गुंतविला जातो परंतु सध्या शेअर्स मार्केट मध्ये प्रचंड निच्चांक येत असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना अतिशय कमी पेन्शन मिळत आहे. ज्यामध्ये त्यांच्या उदरनिर्वाह होणे सुद्धा कठीण होत चालले आहे. म्हणून जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पेंशनची मागणी पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर राजेंद्र शिंदे यांची कन्या कु. क्रांती राजेंद्र शिंदे हिच्या भाषनाने सुरवात झाली. कु. क्रांती ने शासनास उद्देशुन जुनी पेन्शन लागु करण्याबाबत अतिशय उत्तम प्रकारे मनोगत व्यक्त केले. तसेच सदर कार्यक्रमात मयत एनपीएस धारक शिक्षक यांचे वडील कायंदे यांनी त्यांच्या शिक्षक मुलाच्या मृत्युनंतर त्यांचे कुटुंबाची होत असलेली हालअपेष्ठा अतिशय भावनिक होऊन व्यक्त केली. तद्नंतर सुरेश सपकाळ, शिवाजीराव कोरडे, गणेश कावळे, डी. बी. काळे रमेश आंधळे, डॉ. रविंद्र काकडे, सचिन उगले, राम शेळके, अशोक तोंडे, मिलिंद कांबळे, एस.एम. कादरी, डॉ. मारुती तेगमपुरे, सनी करकम, विनोद वाघ, मंगेश जैवाळ, ईश्वर , गाडेकर, संतोष देशपांडे, रामदास शिराळे, राहूल झेंडेकर, सुधीर डहाळे, वसंतराव देशमुख, सोनलकर मॅडम, खडके आन्ना, प्रविण पवार, आणि पी. बी. मते व इतर संघटनांच्या पदाधिकारी यांनी जुनी पेन्शन लागु करण्याबाबत मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने सदर मोर्चा संपन्न झाला.
निवेदन जिल्हाधिकारी जालना यांचे मार्फत शासनास सादर करण्यात आलेले असुन सदरील निवेदनावर पी. बी. मते, याह्या पठाण, प्रविण पवार, संजय चव्हाण, संतोष अनर्थे, गणेश कावळे, संजय चंदन, राजू निहाळ, एम.ओ. चंद्रहास, राजेंद्र शिंदे, व्यंकट दंडेवाड, बालजी जामगे, विनोद भालेराव, उद्धव मिसाळ, इश्वर गाडेकर, श्रीम ती स्वाती राठोड, श्रीमती भाग्यश्री देसाई, श्रीमती संगीता चव्हाण, श्रीमती प्रिती चौधरी, श्रीमती वैशाली डिघूळे, माधुरी मोरे, गणेश कुलकर्णी, डी.बी. काळे, पी. एस. वाघ, बी.बी. तायडे, अशोक तोंडे, सुनील रोकडे, संजय लोंढे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.