परतूर । प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पांतर्गत परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 88 कोटी रुपयांचा निधी रस्ते विकासासाठी प्राप्त झाल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्रकार दिली आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की, मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून विकासासाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही असेही या पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील खालील रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाला आहे
आष्टी ते रायगव्हाण रस्ता रामा 61 किमी 202/ ते 205/800 मध्ये नळकांडी पुला सह सुधारणा करणे (किंमत 8 कोटी) परतुर तालुक्यातील राममा -558 सी ते संकणपुरी सावरगाव गुंज रस्ता रामा-62 किमी 10/000 ते 12/500 मध्ये सूटलेले लांबीचे बांधकाम करणे* (किंमत-7 कोटी) परतुर तालुक्यातील परतुर सेलु रस्ता रा.मा.253 किमी 16/500 ते 19/00 व 20/00 ते 22/00 25/00 ते 30/00 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे (किंमत-7 कोटी )
परतुर तालुक्यातील येनोरा, पाटोदा जांब रस्ता रा.मा.223/ किमी 112/500 ते 118/500 मध्ये रुंदीकरनासह सुधारणा करणे.किंमत -7 कोटी मंठा तालुक्यातील गारटेकी ते दहा तसेच तळणी देवठाणा रस्त्यावरील उर्वरित रस्ता रामा-227 किमी 37/600 ते 40/00 44/800 ते 53/00 पुलासह रुंदीकरनासह डांबरीकरण करणे ची सुधारणा करणे (किंमत-7 कोटी 50 लाख) परतुर तालुक्यातील पांडेपोखरी आसानगाव रामा-61 ते ढोनवाडी कोकाटे हादगाव पिंपळी धामनगाव सावरगाव रस्ता प्रजिमा-30 च्या सूटलेल्या लांबीचे बांधकाम करणे किमी 0/00 ते 2/500 व 10/00 ते 11/350 बांधकाम करणे* (किंमत -800 लक्ष) परतुर तालुक्यातील आंबा बाबूलतारा ते प्ररामा -02 रस्ता प्रजिमा -29 किमी 3/300 ते 5/500 रस्त्याची सुधारणा करणे किंमत-6 कोटी) परतुर तालुक्यातील राममा – 548 सी लोणी ते गोळेगाव रस्ता इजिमा-134 किमी 0/00 ते 07/00 ची नळकांडी पुलासह रस्त्याची सुधारणा करणे (किंमत 7 कोटी) मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी ते शंभू महादेव ते रामा – 222 पर्यन्त इजिमा – 58 किमी 0/00 ते 5/500 रस्त्यावरील पुलासह रस्त्याचे बांधकाम करणे (किंमत 5 कोटी)
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रामा-548 सी ते ईंचा ते टाकळखोपा ते वाघाळा रस्ता ग्रामा -79 किमी 0/00 ते 06/00 रस्त्यावरील पुलासह रस्त्याचे बांधकाम करणे*( किंमत-5 कोटी 50 लाख)
जालना जिल्हातील प्रजिमा-13 ते कीर्तापुर ते जिल्हा सरहद पर्यन्त ग्रामा-09 किमी 0/00 ते 03/500 रस्त्यावरील पुलासह रस्त्याचे बांधकाम करणे* (किंमत-3 कोटी 50 लक्ष
जालना जिल्ह्यातील प्रजिमा -12 ते बेलोरा ते जिल्हा सरहद बोरखेडी रस्ता ग्रामा -73 किमी 0/00 ते 02/00 रस्त्याची पुलासह बांधकाम करणे (किंमत-1 कोटी 50 लक्ष) इजिमा-67 ते शिवणी राठोड नगर ग्रामा-163 किमी 0/00 ते 3/500 रस्त्यावरील पुला रस्त्याचे बांधकाम करणे (3 कोटी ) मतदार संघातील रस्त्यांच्या बांधकामासाठी 75 कोटी रुपयांचा निधी तर परतुर शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी व मंठा येथील व्हीआयपी शासकीय विश्रामगृह व कर्मचार्यांच्या निवासस्थानासाठी तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे