परतूर । प्रतिनिधी – येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकणार्या विद्यार्थ्यास जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बोलावून चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना दि 8 मार्च रोजी घडली. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश परमेश्वर माकोडे रा. परतूर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की दि 8 मार्च रोजी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास मित्रा सोबत जिल्हा परीषद शाळा परतुर येथे बसलेलो असताना संकेत वाघ याचा फोन आला की, तु जिल्हा परीषद शाळेच्या पाठीमागे ये तुझ्याशी बोलायचे आहे.
जिल्हा परीषद शाळेच्या पाठीमागे गेलो असता तेथे संकेत वाघ, शंकर हिवाळे व त्याचे ईतर चार मित्र हे तेथे होते. संकेत वाघ यास कशासाठी बोलवले विचारले असता त्याने शिवीगाळ करून गाडी घेवुन आमच्या समोरुन फिरतोस असे म्हणून सर्वांनी लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. काट्यामध्ये फेकले. उठुन उभा राहीलो असता संकेत वाघ व शंकर हिवाळे यांनी त्यांच्या कमरेचे चाकू काढले. संकेत वाघ याने जिवे मारण्याच्या उद्देशाने पाठीमागुन उजव्या पाठीत चाकुने भोसकले व शंकर हिवाळे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने समोरुन चाकु मारत असताना चाकु धरून आरडाओरडा केल्याने संकेत वाघ, शंकर हिवाळे व त्याचे चार मित्र हे तेथुन पळुन जात असल्याचे सोबत असलेल्या मित्रांनी पाहील्याने व ओरडण्याचा आवाज आल्याने मित्र आले. त्यांनी चाकु मारल्याचे पाहुन व रक्त निघत असल्याने उचलुन परतुर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले व तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन जालना येथे खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. सध्या जखमीवर जालना येथे. अति दक्षता विभागात उपचार सुरू आहे. या प्रकरणी दि 10 मार्च 2023 रोजी संकेत वाघ, शंकर हिवाळे व त्याचे चार मित्र सर्व रा. परतुर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करीत आहेत.