जालना । प्रतिनिधी – लॉयन्स इंटरनॅशनलच्या 3234 एच – 2 च्या जालन्यात पार पडलेल्या शिखर विभागीय परिषदेत लॉयन्स क्लब ऑफ जालनाचे लॉ. राजेश भुतिया यांना प्रांतातील बेस्ट प्रेसिडेंट, लॉ. गिरीश पाकणीकर यांना बेस्ट ट्रेझरर, लॉ. सौ. मिनाक्षी दाड यांना बेस्ट झोन चेअरपर्सन तर लॉ. सौ. स्मिता मित्तल यांना बेस्ट व्हाईस प्रेसिडेंट अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. जालना लॉयन्स क्लबला या शिखर परिषदेत एकूण 15 अवार्ड मिळाले, ही जालन्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
लॉयन्सचे प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया, उज्जैनचे माजी प्रांतपाल लॉ. बलबीर सिंग साहनी, उपप्रांतपाल लॉ. सुनील देसरडा, लॉ. गिरीश सिसोदिया, माजी प्रांतपाल लॉ. विजयकुमार बगडिया, प्रांत प्रशासकीय प्रमुख लॉ. सुभाषचंद्र देविदान, प्रांत सचिव लॉ. अरूण मित्तल, कोषाध्यक्ष लॉ. राजेश कामड, गॅट समन्वयक लॉ. अतुल लड्डा, जी. एस. टी. समन्वयक लॉ. इंदरपाल सिंग बग्गा, झोन चेअरमन लॉ. सुनील बियाणी, समन्वयक लॉ. सुशील पांडे यांच्या हस्ते व लॉ. राजेश लुणिया, लॉ. सोनाली जयपुरिया, लॉ संगीता बियाणी, लॉ, विनोद पवार, लॉ. सुशील पांडे, लॉ दशरथ कळमकर, लॉ. प्रदीप गोलेच्छा यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना लॉयन्स क्लबला 15 अवार्ड प्रदान करण्यात आले. त्यात बेस्ट प्रेसिडेंट, बेस्ट ट्रेझरर, बेस्ट झोन चेअरमन, बेस्ट व्हाईस प्रेसिडेंट, बेस्ट क्लब, क्लब बेस्ट स्क्रॅपबुक, बेस्ट बॅनर प्रेझेंटेशन, बेस्ट फोटो डिस्प्ले, बेस्ट स्थायी प्रकल्प दृष्टी, बेस्ट स्थायी प्रकल्प ऑर्थोपेडिक बँक, बेस्ट क्लब विस्तार, क्लबचा स्वाक्षरी उपक्रम, बेस्ट ऍप्रिसिएशन, जीएसटी अवार्ड, एन्व्हायरमेंट अवार्ड या 15 पुरस्कारांचा समावेश आहे.
लायन्स क्लबचे अध्यक्ष लॉ. राजेश भुतिया, सचिव लॉ. राधेशाम टिबडेवाल , कोषाध्यक्ष लॉ. गिरीश पाकणीकर आणि पदाधिकार्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. क्लबला प्रांतातून उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वाधिक 15 अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल आमचे मनोबल उंचावले असून, आगामी काळात यापेक्षा अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. या पुरस्काराचे श्रेय सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना जाते, असे अध्यक्ष लॉ. भुतिया आणि सचिव लॉ. टिबडेवाल यांनी सांगितले. जालना लॉयन्स क्लबला सर्वाधिक अवार्डने सन्मानित करण्यात आल्याबद्दल क्लबचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.