परतूर । प्रतिनिधी – संतोष आखाडे यांची परतूर तालुका बहुउद्देशीय ग्रामीण कारागीर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्यासह व्हाईस चेअरमन पदी विमलताई मुळे तर संचालक पदी दादाराव पाडेवार,रावसाहेब सागुते,पांडुरंग घटमाळ,सुभाष भदर्गे,महादेव माने,प्रविध प्रधान,येणुबाई घोडे,सुंदर खंदारे,राजेश वाघमारे,यांची निवड करण्यात आली आहे.या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असुन एक सामान्य दलित चळवळीचा कार्यकर्ता म्हणून ते पत्रकार विविध संस्थावर पदाधिकारी व चेअरमन असे पद भुषवत संतोष आखाडे यांनी आपला वेगळा परीचय निर्माण केला आहे.एक सामान्य कुटुंबात जल्मलेले संतोष आखाडे यांनी एकेकाळी कष्ट करून मोलमजुरी करत आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले.त्यात त्यांनी अनेक विविध प्रकार चे शासकीय कामे लोकांचे मार्गी लावून दिलेले आहे.आपल्या कुशल कर्तबगारीने आपल्या स्वता:चे अस्तित्व निर्माण केले आहे.ते अनेक वर्षांपासून सोसायटी राजकारणात हि सक्रिय असुन या कार्याची पावती म्हणून दुसर्यांदा चेअरमन पदाची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.बहुउद्देशिय ग्रामीण कारागीरांची सहकारी संस्था मर्यादित परतूर चेअरमन पदी निवड करण्यात आली. यावेळी राजकीय पुढारी,पत्रकार बांधव,व मित्र परिवार यांनी संतोष आखाडे यांचे अभिनंदन केले.