जालना । प्रतिनिधी – सामाजिक, आरोग्य, महिला सबलीकरण या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रेड स्वस्तिक सोसायटी शाखा जालनातर्फे लॉयन्स क्लबच्या झोन चेअरमन लॉ. मिनाक्षी विजयकुमार दाड यांना नारीरत्न पुरस्कार-2023 ने सन्मानित करण्यात आले.
दि. 10 जानेवारी रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी रेड स्वस्तिक सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास दरगड, अध्यक्ष बंकटलाल खंडेलवाल, सचिव संतोष लिंगायत, कोषाध्यक्ष इंद्रजित जाधव, राष्ट्रीय डायरेक्टर विजय दाड, माजी कोषाध्यक्ष सतीश संचेती यांच्या हस्ते मिनाक्षी दाड यांना नारीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सौ. मीनाक्षी दाड यांचे सामाजिक क्षेत्र, लायन्स क्लब, महिला सक्षमीकरण आदी सर्वच क्षेत्रात अमूल्य कार्य आहे. लायन्स क्लब ऑफ जालनाच्या अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. सध्या त्या लॉयन्स डिस्ट्रिक्टमध्ये झोन चेअरमन आहेत. माहेश्वरी समाज, जालना जिल्हा माहेश्वरी महिला संघटन, महाराष्ट्र प्रदेश महिला संघटन, साहित्य समिती समन्वयक, माहेश्वरी महिला प्रगती समितीमध्ये त्या समर्पित सेवा भावनेतुन कार्य करित असतात. त्या जालना मर्चंट बँकेच्या संचालक म्हणून सलग तिसर्यांदा विजय झाल्या आहेत. रेड स्वस्तिक सोसायटीच्याही त्या सदस्य आहेत. दिनांक 11 मार्च रोजी नुकत्याच पार पडलेल्या विभागीय परिषदेत त्यांना बेस्ट झोन चेयरमन चा अवार्ड देऊन नवाजण्यात आले आहे. त्यांच्या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने नारी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होता आहे.