जालना । प्रतिनिधी – समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने अँड सुनील किनगावकर यांच्या निवासस्थानी बैठक झाली या बैठकीचे अध्यक्षस्थानी 2022 परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अँड सुनील किनगावकर हे होते तर प्रमुख म्हणून विनायक महाराज फुलंब्रीकर दीपक रणनवरे सुरेश मुळे संजय देशपांडे अँड विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्वानुमते 2023 परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमोल मोहरीर यांची एकमताने निवड करण्यात आली असून उर्वरित कार्यकारणी लवकरच अमोल मोहरीर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असल्याचे अँड सुनील किनगावकर यांनी सांगितले यावेळी सुनील किनगावकर म्हणाले की 2022 ची परशुराम जन्मोत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला त्यामध्ये आपण सामाजिक सांस्कृतिक अशी कार्यक्रम घेतले याही वेळेस सांस्कृतिक सामाजिक व विविध असे कार्यक्रम घेऊन परशुराम जयंती साजरी करावी अशे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. यावेळेस विनायक महाराज फुलंब्रीकर दीपक रणनवरे सुरेश मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शहरांमध्ये संपूर्ण शहरात घराघरात परशुराम जन्मोत्सव समितीची माहिती देऊन समाज एकत्रित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून समाजाच्या उपयोगी विविध उपक्रम राबवावेत असे यावेळी सांगण्यात आले.