अनिल जिंदाल स्कूल येथे कायदेशीर शिबिर

58

जालना – पोक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने 2012 साली तयार केलेला कायदा आहे. पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेसचे लघुरूप आहे. या कायद्याबद्दल तथा जल संरक्षण बद्दल कायदेशीर शिबिराचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या मार्फत अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल येथे आयोजित करण्यात आलेले आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वि.एम मोहिते , जिल्हा न्यायाधीश अंजली इनामदार , दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती पी.पी . वाघ,नुतन देसाई ,अध्यक्षा, कुंडलिका सीना रिज्यूवनेशन न्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन, जालना, अमृता मिस्त्री कोटकर अध्यक्ष इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझन, एडवोकेट अश्विनी धनावत, स्थानिक महिला तक्रार निवारण समिती जिल्हाधिकारी कार्यालय जालना हे उपस्थित राहणार आहे. एडवोकेट अश्विनी धनावत ही अंमली पदार्थांचा दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करणार आहे तर नूतन देसाई हे पाणी संरक्षण वर बोलणार आहे. तर न्यायाधीश मंडळ हे पोस्को कायदा संदर्भात मुलांना मार्गदर्शन करणार आहे. बारवाले महाविद्यालय चे एनसीसी ची मुली सुद्धा या कायदेशीर शिबिरात उपस्थित राहणार आहे.या शिबिरामुळे मुले कायदे दूत बनतील असा विश्वास श्रीमती पी पी वाघ भारसाकडे यांनी व्यक्त केले आहे तर इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझन तर्फे मुलांसाठी अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येईल असे प्रतिपादन अमृता मिश्रीकोटकर यांनी प्रतिपादित केले.ताक्रार निवारण समिती जिल्हाधिकारी कार्यालय जालना हे उपस्थित राहणार आहे. एडवोकेट अश्विनी धनावत ही अंमली पदार्थांचा दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करणार आहे तर नूतन देसाई हे पाणी संरक्षण वर बोलणार आहे. तर न्यायाधीश मंडळ हे पोस्को कायदा संदर्भात मुलांना मार्गदर्शन करणार आहे. मुलांनी पाणी बचाव यावर चित्रित केलेले व तयार केलेले बोधवाक्य प्रदर्शित करणार आहे, अशी माहिती अनिल जिंदल वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य श्रीमती शुभ्रा वर्मा यांनी दिली आहे.