परतूर । प्रतिनिधी – बूथ सशक्तिकरण अभियानाच्या माध्यमातून शक्ती केंद्रप्रमुख विस्तारक बूथ प्रमुख यांनी, समाजाच्या प्रत्येक घटकातील युवा महिला यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रवास आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
ते परतुर येथे आयोजित बूथ सशक्तिकरण अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गात बोलत होते.
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की भूत समितीमधील कार्यकर्त्यांना बूथ अध्यक्ष, बूथ सचिव, यांच्यासह कार्यकारिणी निवड करणे गरजेचे असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा येत्या 26 मार्च रोजी होणारा मन की बात कार्यक्रम प्रत्येक बूथप्रमुखांनी करणे आवश्यक असून एप्रिल महिन्यातील शेवटच्या रविवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी होणारा 100 वां मन की बात कार्यक्रम, नाविन्यपूर्ण साजरा करण्याचे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित बूथ पदाधिकार्यांनीं दिले, पुढे बोलताना ते म्हणाले की प्रत्येकाने भूत स्तरावर व्हाट्सअप ग्रुप निर्माण करणे आवश्यक असून प्रत्येक बूथ प्रमुखाकडे सगळी समाज माध्यमे इन्स्टॉल असावी व त्या माध्यमातून मोदीजी ने केलेल्या विविध विकासाच्या योजना प्रसारित केल्या जाव्यात असेही यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले.
मतदार संघातील 325 बूथ मजबूत बूथ असावेत, यासाठी शक्ती केंद्रप्रमुखांनी व विस्तारकांनी प्रवासाचे नियोजन करून, त्या माध्यमातून भूत मजबूत बनवण्याची प्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले, मतदार यादीतील कार्यकर्त्यांना तेच प्रमुख म्हणून नेमण्यासाठी बूथ प्रमुखांनी याद्याचे व्यवस्थित अध्ययन करून पेज प्रमुखांची निवड करावी असे यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले.
बूथ समितीतील निवड केलेल्या पदाधिकार्यामार्फत, लाभार्थी संपर्क युवा प्रमुख महिला प्रमुख अन्य समाज प्रमुख, की वोटर्स प्रमुख आधीच्या निवडणुका तात्काळ करून घ्याव्यात असेही यावेळी त्यांनी नमूद केले
या बूथ सशक्तिकरण अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त सदस्य संख्या जोडण्याबरोबरच सरल प सर्वांनी डाउनलोड करावे व आपली इत्यंभूत माहिती या प मध्ये समाविष्ट करावी असे यावेळी उपस्थित त्यांना त्यांनी सांगितले. यावेळी गणेश राव खवणे संदीप गोरे, भाजपा तालुकाध्यक्ष सतीश निर्वळ, रमेश भापकर प्रकाश टकले, राजेश मोरे, ज्ञानेश्वर शेजुळ पंचायत समिती उपसभापती रामप्रसाद थोरात, हरिराम माने नाथराव काकडे, शिवाजी पाईकराव रामेश्वर तनपुरे, गणेश पवार, नगरसेवक संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण, प्रवीण सातोनकर, कृष्णा आरगडे, गजानन उफाड, विक्रम उफाड, संपत टकले नरसिंग मामा राठोड, शत्रुघन कणसे, नारायण दवणे तुकाराम सोळंके सिद्धेश्वर सोळंके परमेश्वर आकात रवी सोळंके गजानन लोणीकर बंडू मानवतकर विवेक काकडे, दीपक दवणे, रोहन अकात, राजेंद्र वायाळ संभाजी वारे, विलास घोडके, नवनाथ चट्टे नितीन सरकटे, जगन टकले, विठ्ठल बिडवे विश्वंभर शेळके हनुमान चिखले यांच्यासह शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख भूत विस्तारकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.