टेंभुर्णी नगरीत जगद्गुरु तुकाराम महाराज बीज निमित्त रघुनाथ महाराज देशपांडे यांचे हरी कीर्तन व भंडारा संपन्न

15

टेंभुर्णी । प्रतिनिधी – टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील श्री संत सावता महाराज यांच्या मंगल कार्यालयात होऊ घातलेल्या पहिल्या वर्षीय श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीज निमित्ताने झालेला कार्यक्रम मोठा उत्सवात आणि आनंदात साजरा झाला. येथील संत सावता माळी मंगल कार्यालयामध्ये एक दिवशी हरिनाम संकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कीर्तन सोहळ्यात हरिभक्त पारायण श्री रघुनाथ देशपांडे महाराज यांनी आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण करताना सांगितले की जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू हा अटळ आहे कारण तुमच्या आमच्या भेटीची व्यवस्था भगवंताने मनुष्य जन्माच्या निमित्ताने केली असली तरी मरणानंतर जन्माची ताटातूट होत असते म्हणून ईश्वराच्या पायावर लीन होऊन मुखी विठ्ठल नाम घेऊन भगवंतप्राप्तीला जाता येते असे प्रतिपादनही त्यांनी केले श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज सदह वैकुंठवासी झाले त्या निमित्ताने राज्यभर तुकाराम बीज चा कार्यक्रम आयोजित केला जातो टेंभुर्णी नगरीत यावर्षी प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी याप्रसंगी महाप्रसादाचा हजारो भाविक भक्त आणि गावकरी मंडळी या भंडारा चा लाभ घेतला . येथील प्रसिद्ध चवदार फोडणीचे वरण आणि महिला वर्गानी करून दिलेल्या चपातीचा लाभ या वेळी सर्वांनी घेतला .हा कार्यक्रम पाहिला वर्षी जरी आयोजित करण्यात आला असला तरी खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला.
ज्ञानदेवा रचिला पाया तुका झालास कळस
वारकरी संप्रदायातील विठ्ठल भक्तीची प्रेरणा वारकरी संप्रदायाला संत ज्ञानेश्वरांनी दिली असली तरी या संप्रदायाचा कळस सोडवण्याचा मान संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांना जातो असेही यावेळी भाविकांनी स्पष्ट केले दरम्यान प्रारंभी रमेश खरात यांच्या हस्ते अनुष्ठान अभिषेक करण्यात आला गणपत भिताडे रामराव जमधडे अंबादास भोरे यांच्यासह इतर भाविकांनी गाथा भजन केले. गावकरी यांनी या कार्यक्रमाला यथा योग्य योगदान दिले.