जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल जाफराबाद येथे जागतिक महिला दिन साजरा

14

जाफराबाद । प्रतिनिधी – जाफराबाद येथील जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल जाफराबाद येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले ,इंदिरा गांधी.यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संजय फलटणकर यांची उपस्थिती होती याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेतील शिक्षिका वंदना दूंनगहू यांनी विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनानिमित्त सखोल असे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शाळेत असलेल्या महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक संजय फलटणकर म्हणाले कीदिनांक 8 मार्च, 1908 रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि नवी पहाट उगवली.
समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग मिळावा व त्या दिशेने करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून राज्यात ’जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.