विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंग्रजी नाट्य स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांना इंग्रजीतून व्यक्त होता यावे हा उद्देश- प्रा. चिंचखेडकर

25

जालना । प्रतिनिधी – नारायणी सेवाभावी संस्थेचे प्रा. श्रीकांत चिंचखेडकर हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवितात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांमधील इंग्रजीची भीती दूर व्हावी, त्यांचे स्टेजरेज वाढावे, मातृभाषा मराठीप्रमाणेच इंग्रजीतूनही त्यांना व्यक्त होता यावे, यादृष्टीने आयोजित इंग्रजी नाट्यस्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
हरी ओमनगर येथे इयत्ता पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. द गोल्डन टच, द वेलकम, द कोर्ट ऑफ चक्रमादित्य महाराज, द स्टोन सूप, आनंदी गोपाळा या इंग्रजी नाटिका विद्यार्थ्यांनी सादर करून कलाविष्कार घडविला. या नाटकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून व्यक्त होत आपल्यातील सुप्त कलेला उभारी दिली.
प्रा. श्रीकांत चिंचखेडकर म्हणाले की, आज कोणत्याही क्षेत्रात इंग्रजी अवगत असणे गरजेचे आहे. अनेकांना इंग्रजी समजते. मात्र, या भाषेतून व्यक्त होता येत नाही. ही अडचण दूर व्हावी आणि त्यांच्यात ही भाषा असख्खलित बोलण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी, यादृष्टीने इंग्रजी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगून त्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व कसे मिळवावे, स्टेजकरेज कसे वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन करून, यापुढेही अशा स्पर्धा आयोजित करण्यात येतील, असे ते म्हणाले.
याप्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी ड. सौ. शैला चिंचखेडकर, जयश्री कुलकर्णी, मंजुषा गिराम, मनोज भाग्यवान, कुणाल भोयर, सौ संजीवनी बोडले आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.