जालना । प्रतिनिधी – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा राज्याला विकासाच्या उंच शिखरावर घेऊन जाणारा असून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी महिला युवक उद्योग या सर्वांना उभारी मिळणार असून, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी 20,000 हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
घर घर जल या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील नागरिकांना नळ जोडणी देण्यात येणार असून मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या प्रकल्पाचा पाठपुरावा करत मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून देवेंद्रजींनी व्यक्त केलेला आहे
महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेत बचत गटांसाठी ही घसघशीत अशा तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आले असून राज्यातील 81 हजार अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आली असून आता यापुढे पाच हजार पाचशे इतके मानधन अंगणवाडी सेविकांना मिळणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
यापुढे महिलांना एसटी प्रवासाच्या तिकिटामध्ये 50 टक्के सूट देण्यात आलेली असून
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार लाख घरे नव्याने बांधण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री देवेंद्रजी यांनी म्हटले असून हा निर्णय स्वागतार्य असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात 700 दवाखाने उभारले जाणारा असून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला राज्यभरात 700 दवाखाने उभारले जाणारा असून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दिली जाणारी दीड लाखाच्या मदतीमध्ये घसघशीत वाढ करण्यात आली असून आता ही मदत पाच लाख रुपयांपर्यंत रुग्णांना मिळणार तर आहे असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प खर्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असून यातून शेतकरी महिला युवक दिन दलित पीडितांना खर्या अर्थाने न्याय मिळणार असून या संकल्पचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी भरभरून कौतुक केले आहे
शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकर्यांना सहा हजार रुपयाची वार्षिक मदत करत असते या मदतीत आता राज्य सरकारी वाटा उचलणार असून राज्याचे सहा आणि केंद्राचे सहा असे 12 हजार रुपये प्रत्येक शेतकर्याला मिळणार असल्याने खर्या अर्थाने हा अर्थसंकल्प शेतकरी भिमुख असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.