जिल्ह्यात महिला स्वसंरक्षण प्रात्यक्षिकाचे 12 ते 18 मार्च कालावधीत आयोजन

21

जालना :  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने दि.17 सप्टेंबर 2022 ते दि.16 सप्टेंबर 2023 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी निर्देश दिलेले आहेत. तरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने दि.12 ते 18 मार्च 2023 या कालावधीत महिला स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. तरी जिल्ह्यातील मुली, महिला खेळाडू  व महिला अधिकारी-कर्मचारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

महिला स्वसंरक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन दि.12 मार्च 2023 रोजी जालना येथील  कामगार कल्याण भवन व सिरसवाडी रोडवरील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात, दि.13 मार्च रोजी  अंकुशनगरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात, दि.14 मार्च रोजी जाफ्राबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयात, दि.15 मार्च रोजी परतूर येथील आनंद माध्यमिक विद्यालयात, दि.16 मार्च रोजी घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंपरी येथील गोदावरी माध्यमिक विद्यालयात, दि.17 मार्च रोजी भोकरदन येथील जिल्हा परिषद शाळेत आणि दि.18 मार्च रोजी बदनापूर तालुक्यातील पांगरी नजीकच्या कै.नानासाहेब पाटील विद्यालयात करण्यात आले आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.