जाफराबाद : राजर्षी शाहू मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित रक्तदान शिबीर शाखा जाफराबाद येथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या भव्य रक्तदान शिबिरामध्ये ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिध्दार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयचे उपप्राचार्य प्रा.डॉ.र.तु.देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संदिप दादा शेळके तर मार्गदर्शक मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तथा पत्रकार एकनाथ घाडगे हे सुत्रसंचलन अल्पबचत प्रतिनिधी विजय खरात यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असताना प्रा.देशमुख म्हणाले की,रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून जाती,धर्म,पंथाच्या सर्व बंधने तोडून सर्वधर्मसमभाव निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगून पुढे बोलताना वाढदिवस म्हटलं की,आज चोहीकडे चंगळवाद,मौज-मजा अशा पद्धतीने साजरा केला जातो.या सर्व गोष्टींना नाकारून राजर्षी शाहू परिवार आणि राजर्षी शाहू मल्टीस्टेट शाखा जाफराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम हा स्तुत्य असून या शिबिरातून अनेक जणांना जीवन आणि आरोग्य मिळेल यात शंका नाही आणि म्हणूनच *दानात दान श्रेष्ठ दान रक्तदान* म्हटले जाते.भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या देशात सर्वात जास्त गरज ही आज रक्त पुरवठ्याची आहे. त्यासाठी अशा कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे प्रतिपादन करत असताना भारतीय सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांनाही प्रसंगी आपण दान केलेले रक्त कामात येऊ शकते आणि अशा राष्ट्रीय कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला जातो हे लक्षात घेण्याजोगे आहे.
रक्तदाना संदर्भातील गैरसमज हळूहळू दुर होऊन आज जन-माणसाचा मोठ्या प्रमाणात रक्तादाना सारख्या राष्ट्रीय कार्यात घेतलेला सहभाग वाखाणण्याजोगा असल्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्रा डॉ देशमुख बोलताना सांगितले.
सोबतच अवयव दान ही देखील एक चांगली संकल्पना असून या आधुनिक,धकाधकीच्या आणि औद्योगिक जीवनात या उपक्रमाची सुद्धा मोठ्या प्रमाणात गरज आहे. यासाठी समाजमन बनतं आहे. हे ही नसे थोडके.
घाडगे यांनी सांगितले की,जिऱ्या तील पाणी उपसल्या नंतर जसे ताजं आणि थंडगार पाणी उपलब्ध होते तसेच रक्तदान केल्यानंतर जवळपास चौवीस तासात पुर्तता होतं असते. सोबतच शरिरातील रोग प्रतिकारशक्ती वाढली की हिमोग्लोबिन,ऍलर्जी सारख्या विविध आजार आपल्या शरीरावर हवी होत नाही.
ज्यांचं हिमोग्लोबिन १२/१३आणि वजन ५० घ्या आसपास आहे अशांनी आवर्जून रक्तदान केले पाहिजे असे एकनाथ घाडगे यांनी सांगितले.
दरम्यान जाफराबाद येथील कार्यक्रमात वरूड,जाफराबाद,टेंभुर्णी आणि आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी रक्तदान केले.
यावेळी विविध पतसंस्थेच्या चेअरमन सोबतच कर्मचारी,माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष,व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते,विविध पक्षांचे पदाधिकारी,आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय जाणकार,जेष्ठ पत्रकार ठेवीदार,खातेदार प्रतिष्ठित नागरिक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा व्यवस्थापक मारोती जाधव,विभागीय व्यवस्थापक राज खडके, राहूल लहाने,ज्ञानेश्वर कोरडे,भागवत खंडागळे,कृष्णा दुनगहू विजय खरात यांनी परिश्रम घेतले.
राजर्षी शाहू मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित रक्तदान शिबिराच्या माध्यमातून २३/०२/२३पासून राजर्षी शाहू जळगाव जामोद,शिरपूर,धाड,वाळूज,नांद्राकोळी,म्हसला,देऊळगाव राजा,माहोरा,जाफराबाद,भारज बु,पिंपळगाव येथील रक्तदान शिबिर पार पडलेली असून मोताळा,शेंदुर्णी,धामणगाव वडे,मेरा,देऊळगाव सार्कषा,नाशिक,डोणगा,उदयनगर,बोदवड,किनगाव राजा,शेलूद,अंडेरा,वालसावंगी,मेहकर,रिसोड,गारखेड,मुक्ताईनगर,मलकापूर,देऊळगाव गुजरी,साखळी,राजूर,चिखली,वाडेगाव,जानेफळ,रायपूर,चांदूर बिस्वा,रोहीणखेड,संग्रामपूर,पातुर्डा,खामगावजालना,दुधा,माटरगाव,सिल्लोड,शेगाव,पहूर,मंगरुळ नवघरे,भोकरदन,साखरखेडा,पिंपळगाव रेणूकाई,करमाड,पिंपळगाव काळे,वरवट बकाल,शेलापूर,शेबा,नांदुरा,सुलतानपूर,देऊळघाट,खारघर,लाखनवाडा,लोणार,फत्तेपूर,डोंगर खंडाळा,सिंदखेड राजा,कन्नड,शेलगाव आटोळ,मयुर पार्क ता.औरंगाबाद,चांडोळ, पिंपळगाव देवी,पारध,देऊळगाव मही,कोलवड,बुलडाणा इत्यादी शाखांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.