जनतेच्या तक्रारीचे वेळेत निवारण करा -शिरीष बनसोडे

49
जालना : तक्रार निवारण दिनी प्राप्त होणा-या जनतेच्या तक्रारीचे वेळेत निवारण करा, त्यांना वारंवार तक्रार निवारण दिनात येण्याची गरज पडणार नाही , असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कोमल कोरे- चाटे, यांची उपस्थिती होती.
    जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पंनेतून महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा स्तरावर तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. आज  एकुण २२ तक्रारी तक्रार निवारण दिनात प्राप्त जाल्या त्यात  पंचायत विभाग , ग्रामीण पाणी पुरवठा, समाजकल्याण विभाग ,  कृषि विभाग  तसेच  शिक्षण विभाग यांचा समावेश होता.
मागील तक्रार निवारण दिनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी सर्व विभाग प्रमुख व् गटविकास अधिकारी यांना आपल्या कार्यालयीन ठिकाणी तक्रारी निकाली काढ़ने बाबत आदेशित केले होते. त्या नुसार काही प्रकरणात काही प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली   तर काही ठिकाणी  गटविकास अधिकारी यांनी पाहणी करुन त्याचा अहवाल सादर केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  परंतू काही प्रकरणात तक्रारदार वारंवार त्याच त्या तक्रारी घेवून येत आसल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यानी  मत व्यक्त केले.
तक्रारदार यांना आपण काय कार्यवाही केली, हे माहित नसल्याने परत तो मुद्दा घेवून येतात , तेव्हा आपल्या विभाग कडून करण्यात आलेल्या कार्यवाही ची माहिती संबधितास द्यावी असे अवाहन ही त्यानी यावेळी केले. तक्रार निवारण दिनी मुख्य लेखा व् वित्त अधिकारी राजू सोळके , डॉ. डी. एल. काबळे जिल्हा पशुधन अधिकारी , समाज कल्याण अधिकारी श्रीमती एस के भोजने , उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा -स्व) श्री बालचंद जमदाडे , कार्यकारी अभियंता श्रीमती विद्या कानडे, शिक्षण अधिकारी कैलास दातखिल, उप अभियंता (बांधकाम )श्रीमती राजहंस यांच्या सह गटविकास अधिकारी , यांची उपस्थिति होती.