समृध्दी महामार्गावर कार उलटून एक ठार तर दोन गंभीर जखमी

39

जालना | प्रतिनिधी – समृध्दी महामार्गावर टायर फुटल्याने भरधाव कार पलटी होऊन भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. यात कारमधील एकजण ठार झाला तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. अमरसिंग शौकिलाल सिंग असे मृताचे नाव आहे. स्कार्पिओ कार (क्र.युपी.91 एन, 7517) पुण्यावरून नागपूरकडे जात असताना चॅनल क्रमांक 380 जवळ कारचे मागचे चाक अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दोन्ही लेनच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकामध्ये जाऊन उलटली. या अपघातात कारमधील अमरसिंग शौकिलाल सिंग (रा.बांदा, उत्तरप्रदेश) यास गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर बिरुसिंग, संजयसिंग शंकरसिंग, राजेशसिंग, भोलासिंग, सर्वेश कुमार राहुरी, दिलीपकुमार रामस्वरुप (सर्व रा.बादा.ता.उत्तरप्रदेश) या मध्ये दोन गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभय दंडगव्हाळ, कर्मचारी कोकणे हे घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.