कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी अभ्यासली ग्रामसभा

12

परभणी । प्रतिनिधी – पुर्णा तालुक्यातील खांबेगाव- महातपुरी ग्रामपंचायत आयोजित ग्रामसभेला कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थीनींनी उपस्थित राहत ग्रामसभेच्या कामकाजा विषयी अवलोकन करत अभ्यासपूर्ण माहिती घेतली.
ग्रामसभेच्या आयोजना मागील भूमिका समजून घेत.ग्रामपंचायत प्रशासनातील लोकसहभाग आणि चर्चा कशी घडून येते याचा अनुभव घेत चर्चेत सहभाग नोंदवला.
खांबेगाव महातपुरी या गट ग्रामपंचायतीने गावातील लोकांच्या सहभागातून आपल्या मुला – मुलींचे बालविवाह लावू नयेत असा ठराव या पूर्वीच पारीत करत नवादर्श निर्माण केला आहे.आंचल गोयल, मा.जिल्हाधिकारी परभणी यांनी गावकर्‍यांन सह सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलिस पाटील या सर्वांचे कौतूक केले.
सुजाण आणि जागृक गावकर्‍यांच्या उपस्थितीत रस्ते,नाल्या, स्वच्छता,आरोग्य सुविधा, डिजीटल स्कूल, पिण्यायोग्य पाणी आदी प्रश्नांबाबत गावकर्‍यांसोबत चर्चा झाली. ग्रामसेवक सौ.संगीता ससाने यांनी मागील बैठकीचा इतिवृत्त सभेत वाचून दाखवला .ग्रामसभेच्या आयोजना पासून तर समारोपा पर्यंत सरपंच सौ.मुक्ताताई कदम यांचे अध्यक्षतेखाली उपसरपंच सौ.इंदुताई एडके, पोलिस पाटील माधवराव दुधाटे,सर्व सदस्य,गावकरी, विद्यार्थीनींनीच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली.
ग्रामपंचायत ची ओळख, रचना, कार्यपद्धती,ठराव मांडणी,साधक बाधक चर्चा, प्रस्ताव तयार करणे,लोकांच्या मागणी, शासकीय योजना व त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते या विषयी ग्रामसेविका सौ.संगीता संसाने यांनी विद्यार्थ्यीनींना माहीती दिली.प्रत्यक्ष ग्रामसभा कशी घेतली जाते या विषयीचा अनुभव विद्यार्थीनींनी घेतला.
या अभ्यास सहली साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष ग्रामसभेत विद्यार्थीनीं, प्राध्यापकां सह उपस्थित राहत उपप्राचार्य डॉ. संगीता आवचार यांनी प्रास्ताविकातून शुभेच्छा देत. महाविद्यालयाच्या वतीने आभार मानले.राज्यशास्ञ विभागाचे प्रा.राहुल चाटसे यांनी गाव कारभाराच्या पध्दती विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आमच्या विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवत प्रकल्प कार्यासाठीचे प्रशिक्षणच पूर्ण केले.असे मत मांडले. प्रा.संजय पटेकर सह,इतिहास विभागाचे प्रा.डॉ.प्रविण नांदरे यांचे योगदान लाभले. ग्रामसेवक सौ.संगीता ससाने यांनी संचलन करत ग्रामसभेचे कामकाज पूर्ण केले.तर प्रा.डॉ.प्रविण नादरे यांनी आभार व्यक्त केले.