सुनील लाखे यांची भाजपा कामगार मोर्चाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती

37

जालना । प्रतिनिधी – जालना शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील लाखे यांची भाजपा कामगार मोर्चाच्या जालना जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या हस्ते नुकतेच लाखे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सिद्धीविनायक मुळे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री अतिक खान, भाजपाचे जालना तालुकाध्यक्ष वसंत शिंदे, वसंत जगताप, सुभाष बोडखे,धनंजय काबलिये, अनिल सरकटे,जुनेद मिर्झा,जगदीश यंगुपटला आदींची प्रमुख उपस्थिती होती.