शिक्षकांनी काळानुसार बदल करावा – कपिल आकात

79

परतूर । प्रतिनिधी – मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेत काम करणारे सर्व कर्मचारी हे आकात कुटुंब आहे. प्रत्येक कर्मचारी हा आकात कुटुंबातील सदस्य आहे. शिक्षकांनी संस्थेत अध्यापण करीत असतांना काळानुसार बदल करावा असे आवाहन संस्थेचे सचिव कपिल आकात यांनी केले. ते येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयात मुख्याध्यापक वसंत सवने यांच्या सेवागौरव कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आशाताई आकात, माजी जी.प सदस्य अमृतराव सवने, जी.प.सदस्य शिवाजी सवने, हनुमंत काटमोडे, सुधाकर सवने, दैठना खू. सरपंच सुनील तायडे, येनोरा सरपंच उद्धव जोगदंड, संतोष डव्हारे, उतमराव खरात, सुभाषराव सवने, अरुण बाहेती, पंडित भूबर, दैठना खू. उपसरपंच राजेश काटकर, यशवंत दुबाले, शरद पाटील, यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना सचिव कपिल आकात म्हणाले की काम करीत असतांना स्व. बाबासाहेब आकात यांच्या निधनानंतर शैक्षणिक संस्थांच्या कर्मचारी यांच्या बळावर संस्थेची घोडदौड सुरू आहे. शिक्षकांनी संस्थेत एकत्र काम करीत असतांना विद्यार्थी दैवत म्हणून काम केल्यास विद्यार्थ्यांची व संस्थेची नक्कीच प्रगती होईल. शिक्षकांनी जागरूक राहून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थीना मन लावून शिकवावे आणि ध्येय समोर ठेऊन शिक्षकांनी काळानुसार बदल करावा. शिस्तबद्ध नियोजन करून संस्थेची यशस्वी वाटचाल करण्याचे आवाहन कपिल आकात यांनी केले. यावेळी संस्थेचे शिक्षक कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेषराव वायाळ यांनी केले. तर सूत्रसंचलन श्रीमती चंदा लड्डा यांनी तर आभार राजकुमार राऊत यांनी मानले.

सेवागौरव कार्यक्रमात मुख्याध्यापक वसंत सवने अश्रू अनावर

सेवागौरव कार्यक्रमात मुख्याध्यापक वसंत सवने आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले असता त्यांना भावुक होत कंठ दाटून येत अश्रू आणावर झाले. मराठवाडा सर्वोदय शिक्षण मंडळात काम करीत असतांना शिक्षक म्हणून काम आणि तसेच मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळत असतांना संस्थेच्या व विद्यार्थी हिताचे काम करीत राहिलो. आणि आज 28 वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे. कुठलेही व्यसन न करता शाळे बाबत परीक्षा नियोजन, निकाल, शिस्त, शालेय पोषण आहार, प्रशाकीय व्यवस्थापन काम चोखपणे पार पाडण्यासाठी रात्र दिवस झटलो. काम करीत असतांना सर्वांच्या सहकार्‍याने काम पूर्ण करू शकलो असे यावेळी बोलतांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत सवने यांनी सांगितले आहे.