घरगुती गॅसच्या दरात वाढ; जालन्यात महिला काँग्रेसची निदर्शने

16

जालना । प्रतिनिधी – केंद्र सरकारने घरघुती गॅसच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ जालना शहरात शुक्रवारी ( दि. 3) जालना जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसूझा,महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार तसेच जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमदार कैलास गोरंट्याल, प्रदेश सचिव प्रा. सत्संग मुंढे, जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्या मार्गदर्शनाखाली व जालना जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. नंदा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
यावेळी निदर्शक महिलांनी घरगुती गॅसच्या दरात वाढ केल्याबद्दल केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. रिकामे गॅस सिलेंडर बाजूला ठेवून चुल मांडून प्रतिकात्मक स्वयंपाकही केला.
या निदर्शनात नम्रता जैस्वाल, चंदा भांगडीया, मंठा तालुकाध्यक्ष अर्चना राऊत, मंदाताई पवार, रमा राठोड, सावित्री इंगळे, लक्ष्मी चांदोडे, सरस्वती जोगदंडे,गणेश चांदोडे, असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष शेख शमशुद्दीन, बाबासाहेब सोनवणे,काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत रत्नपारखे, मंदा गोरे, वंदना राऊत, समाधान खाडे, अविनाश खरात यांच्यासह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.