इंग्रजी शिक्षणाबरोबरच मराठी संस्कृती जोपासण्याचे काम जिजाऊ स्कुलने केले- माजी आ. संतोष सांबरे ; बाल चिमुरड्यांच्या बहारदार नृत्याविष्काराने जिजाऊ इंग्लिश स्कुलच्या स्नेहसंमेलनात रंगत

19

अंबड । प्रतिनिधी – शहरातील जिजाऊ इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन काल दिनांक 26 फेब्रुवारी रविवारी दुपारी 4 वाजता पंडीत गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले.यावेळी स्कूलमधील चिमुकल्यांच्या विविध गीतावरील नर्त्यांनी व बहारदार अदाकारीने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ वंदना ने करण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन अंबड-बदनापूर विधानसभेचे माजी आमदार संतोष सांबरे ,संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर उबाळे,पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे , व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उबाळे ,शिवसेना तालुका संघटक दिनेश काकडे , जि प सदस्य डॉ नंदकिशोर पिंगळे ,अंबड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जिगे ,पत्रकार अशोक शाह , संदीप खरात , सरपंच गजानन कडुळे , उद्योजक अशोकराव उबाळे सरपंच संतोष जगताप, गीताराम मते,पत्रकार श्रीधर कापसे , तरंग कांबळे, महेश साठे, आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. सांबरे म्हणाले की, इंग्रजी शिक्षणाबरोबरच मराठी संस्कृती जोपासण्याचे काम गेल्या 12 वर्षांपासून जिजाऊ स्कुल ने केले याचा मी साक्षीदार असून ही स्कुल माझी समजून सहभागी आहे.तसेच अंबड पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी ग्रामिण भागातील मुले हेच खरे देशाचे भविष्याचे शिल्पकार असल्याचे सांगितले, तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर उबाळे यांनी जिजाऊ इंग्लिश स्कुल चा गेल्या 12 वर्षाचा लेखा जोखा सांगून भविष्यातील संकल्पना व उद्दीष्ट सांगितले. यावेळी स्कुल च्या मुलांनी देवा श्री गणेशा, एकच राजा इथे जन्माला, स्वच्छता अभियान, बेटी बचाव, राष्ट्र भक्ती, शेतकरी आत्महत्या, सोशल मीडिया, हवा हवाई, पिंगा ग पोरी पिंगा,चला जेजुरी ला जाऊ,फिर बि दिल है हिंदुस्थानी, बम बम बोले, आय लव माय इंडिया, मैने पायल है छनकायी, वेड, या सह एका पेक्षा एक , अशा अनेक गाण्यांवर डान्स व आपल्या अदाकारीचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सविता मुळे व गायत्री पाटील यांनी तर आभार प्रदर्शन शुभांगी मोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव सौ गंगासागर उबाळे, संचालक रुस्तुम शिंदे,बद्रीनाथ मोटकर,नामदेव मुळे, जितेंद्र पवार, उमेश कुलकर्णी, रणजित उढान, रामेश्वर उबाळे, हरिओम उबाळे, जयराज उबाळे, वैभव कामटे, भूषण सोनवणे, सुमित शेळके विशाल उबाळे,कु. दिव्या उबाळे, सुरेखा जाधव, यांच्यासह सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास अंबड तालुक्यातील, डॉक्टर, वकील, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, पोलीस, व आदी कर्मचारी, सरपंच उपसरपंच, महिला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.