टेंभुर्णी । प्रतिनिधी – टेंभुर्णी येथील आरजे संजीवनी क्लासेस टेंभुर्णी येथे वर्ग 10 वी विद्यार्थ्याना रविवार रोजी निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लोणी येथील हरिभक्त परायण सखाराम सानप महाराज (लोणी)हे होते., टेंभुर्णी गावचे सरपंच श्री गौतम भाऊ म्हस्के, जे. बी.के. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री चेके सर, जे. बी.के. विद्यालयाचे संचालक प्रा. देशमुख सर, जे. बी. के. विद्यालयाचे निवृत्त शिक्षक श्री गाडेकर सर, मानव सेवा मंडळाचे प्रांत सचिव श्री नसिम सर, मानव सेवा मंडळाचे शहर अध्यक्ष श्री संजय राऊत सर, टेंभुर्णी पोलीस दलातील पोलीस अधिकारी श्री भुतेकर साहेब,श्री धोंडगे साहेब, पत्रकार श्री फकरू कुरेशी सर, श्री साबेर सर, ई.बी.के. विद्यालयाचे शिक्षक श्री देशमुख सर,श्री तडवी सर,श्री जोशी सर त्याचबरोबर संजीवनी प्रायमरी इंग्लिश स्कूल चे प्राचार्य श्री संतोष घोडके सर, सौ ज्योती सांगळे मॅडम,सौ भाग्यश्री जाधव मॅडम,सौ कविता देशमुख मॅडम, सौ सुनिता कुलकर्णी ताई, डावर गाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण श्री जी. डी. जाधव सर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नवरा शिक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक दत्ता देशमुख त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करताना सांगितले की आपण आपले ध्येय निश्चित करा, येणार्या काळामध्ये नवीन शिक्षण प्रणाली येत असून त्यावर कौशल्याच्या आधारित शिक्षण मिळणार असून आपल्याला ध्येय निश्चित करावे लागणार आहे, तसेच येत्या काळामध्ये आपण दहाव्या वर्गासाठी परीक्षेला सामोरे जात असताना आपण कोणत्याही प्रकारचा टेन्शन न घेता परीक्षेला सामोरे जा. तसेच प्राचार्य भास्करवाचे की यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नशीम शेख, संजय राऊत, फकरू कुरेशी, टेंभुर्णी गावच्या सरपंचांचे प्रतिनिधी गौतम मस्के, पीएसटी भुतेकर साहेब, आदींनी आपली समायोजित भाषणे केली प्रत्येक क्षेत्रातील नामवंत व प्रसिद्ध व्यक्तींना या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्याना या सर्वांकडून त्यांच्या वैयक्तिक क्षेत्रातील माहिती मिळावी हा यामागचा हेतू होता. सर्व प्रथम त्रिकुटा माता यांची पूजा करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. वर्ग 10 वी व वर्ग 9 विच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थितांचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सतीश जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधाकर देशमुख सर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सांगळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी शेवटी आकर्षक भेटवस्तू क्लास ला आठवण म्हणून दिल्या. सर्व विद्यार्थ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.