जालना । परतूर । प्रतिनिधी – आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी असून समाजाचे ऋण मी कदापि विसरणार नाही, सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानेच मी थेट सरपंच पदापासून तर मंत्रिपदापर्यंत पोहोचू शकलो, असे भाऊ उद्गार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी काढले. ते जिल्हाभरात विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी माझा वाढदिवस स्वतःहून कधी साजरा केला नाही जनसामान्यांच्या मनात आपण आपले स्थान निर्माण केल्यामुळे माझ्यावर प्रत्येक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला त्याबद्दल सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले की मी लोणी गावच्या सरपंचापासून सुरू केलेला प्रवास थेट मंत्रीपदापर्यंत झाला मात्र यात सर्वसामान्य जनतेचा सिंहाचा वाटा असून या सर्वसामान्य जनतेमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की मी जिल्हाचा विकास करण्यासाठी पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर निधी आणला जिल्हाभरामध्ये विजेचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर वॉटर ग्रेड पंढरपूर शेगाव दिंडी मार्ग, वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात 49 तेहतीस के वी दोन 220 के के वी केंद्र निर्माण केली जलयुक्त शिवार च्या माध्यमातून मतदार संघामध्ये मोठे काम उभे केले आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये काम करीत असताना कार्यकर्ता नागरिक यांना केंद्रबिंदू म्हणून काम केले त्यामुळेच इथपर्यंत मी पोहोचू शकलो असे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
यावेळी दिनांक 28 रोजी परतुर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य संयोजक हरिराम माने शहाजी राक्षे, शिवाजी भेंडाळकर यांच्यावतीने आयोजित जंगी कुस्त्यांचा फड रंगला होता यामध्ये 1100 च्या वर राज्यातील पहिलवानांनी सहभाग नोंदवला, दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या कुस्त्या रात्री तीन वाजेपर्यंत सुरूच होत्या यासाठी मोठ्या प्रमाणावर दर्शकांनी गर्दी केली होती तर दिनांक 01 मार्च रोजी जालना येथे मुख्य संयोजक सागर बर्दापूरकर यांच्या वतीने वेद शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके मोफत धान्य आमदार लोणीकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी मंत्र पठण करून मी दिवस धन्य पूजन करून वितरित करण्यात आले
मच्छिंद्रनाथ चिंचोली कुंभार पिंपळगाव राणी उंचेगाव यासह घनसावंगी तालुक्यात ठिकठिकाणी आमदार बबनराव लोणीकर यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केला
तर आष्टी तालुका परतुर येथे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची भव्य लाडू तुला करण्यात आली व आष्टी सर्कल कोकाटे हदगाव सर्कल भाजपाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आष्टी येथील ग्रामपंचायत इमारतीचे नूतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले
तर परतूर येथे परतुर शहर भाजपाच्या वतीने भव्य असे लाडू तुला करण्यात आली त्याचबरोबर श्री संत सेवालाल महाराज यांच्या परतुर येथील नियोजित मंदिरासाठी नगरसेवक प्रकाश चव्हाण यांच्याकडून 51 हजारांचा चेक तर नगरसेवक प्रवीण सातोनकर यांच्याकडून 21 हजारांचा चेक यावेळी मंदिरासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आला त्याचबरोबर परतुर शहर भाजपाच्या वतीने परतुर शहरातील गेल्या तीन महिन्यापासून वेतन नसलेल्या नगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांना धान्य किटचे वाटप करण्यात आले तसेच नगरसेवक कृष्ण आरगडे यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, तर डॉक्टर पोकळे यांनी परतूर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते
दरम्यान या कार्यक्रमासाठी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर भगवानराव मोरे गणेशराव खवणे भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर,आळंदीचे नगरसेवक पांडुरंग वहिले, पंचायत समितीचे सभापती रंगनाथ येवले रामप्रसाद थोरात, सुदाम प्रधान राजेश मोरे बद्रीनारायण ढवळे सुरेश सोळंके कैलास बोराडे शिवसेनेचे उदयसिंग बोराडे नगरसेवक दीपक बोराडे गणेश बोराडे तुकाराम सोळंके सिद्धेश्वर सोळंके विलासराव आकात विठ्ठलराव काळे माऊली वायाळ संपत टकले शत्रुघ्न कणसे नरेंद्र साठे आनंद जाधव अमोल मोरे आनंद जाधव विलास घोडके महेश पवार रवी सोळंके आष्टीचे सरपंच मधुकर मोरे बबलू सातपुते अमोल जोशी बाबाराव थोरात, विष्णुकाका शहाने तर परतूर येथील कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष गणेश पवार, नगरसेवक संदीप बाहेकर सुधाकर सतोनकर दिनेश कुमार होलानी, प्रकाशराव चव्हाण, सुबोध चव्हाण नगरसेवक कृष्णा आरगडे बालाजी सांगोळे, संतोष हिवाळे, राजेंद्र मुंदडा सोनू अग्रवाल किशोर कद्रे, नरेश कांबळे नरेश रायपिल्ली मनोज माटोले, विजय यादव, गणेश ठाकूर विठ्ठल बिडवे वसंत काटकर, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक वकील डॉक्टर यांची उपस्थिती होती