जालनाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी राहुल खाडे यांची नियुक्ती

91
जालना | प्रतिनिधी – जालना येथील अप्पर पोलीस अधीक्षक पदी अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल डी. खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी मंगळवारी(दि. 28) रोजी याबाबत आदेश दिले आहेत.
जालना येथील अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांची 8 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस उपायुक्त पुणे शहर येथे बदली झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यापासून हे पद रिक्त होते. दरम्यान, शासनाच्या गृह विभागाकडून  अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल डी. खाडे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल डी. खाडे यांनी यापूर्वी औरंगाबाद येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले आहे. दरम्यान, बुधवारी(दि. 1) मार्च रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.