जालना । प्रतिनिधी – शिवसेना पक्षात अनेक लोक आले काही निघूनही गेले. परंतु त्यांच्या जाण्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले विचार संपणार नाहीत. कितीही आघात झाले तरी शिवसैनिक पुन्हा प्रचंड ताकदीने उभा राहतो हे अनेकदा सिध्द झाले आहे, असे मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी जालना येथील शिवगर्जना मेळाव्याप्रसंगी म्हणाल्या.
यावेळी माजी आमदार अनिल कदम, युवासेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अंकित प्रभु, लक्ष्मणराव वडले, शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे.बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, रमेश गव्हाड, माधवराव कदम, भगवानराव कदम, रावसाहेब राऊत, मुरलीधर शेजुळ, बाबुराव पवार, मनिष श्रीवास्तव, परमेश्वर जगताप, बाबासाहेब तेलगड, अशोक आघाव, हनुमान धांडे, त्तमराव वानखेडे, युवासेना राज्यविस्तारक भरत सांबरे, शिवाजी शेजुळ, गणेश काळे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पेडणेकर म्हणाल्या की, पक्षाचे चिन्ह, नाव, गेल तरी सामान्य शिवसैनिक व नागरिकांच्या मनातील उध्दव ठाकरे यांचे स्थान कुणीही हिरावून घेवून शकत नाही. आगामी काळातही महाविकास आघाडी ही काळाची गरज असून सर्वांंनी एकत्र येत विरोधकांचा सामना करावा लागणार असल्याचा त्या म्हणाल्या. कोविड काळात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांची प्रचंड काळजी घेतली, त्यांना धीर दिला. कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणू दिली नाही. याची सामान्य नागरिकांना पुर्ण कल्पना आहे. त्यामुळे सामान्य नागरिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभा असल्याचे चित्र दिसते. पक्षाचे युवानेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे पक्षातील बंडखोरीनंतर अत्यंत ताकदीने कामाला लागले असून राज्यात सर्वत्र फिरवून ते जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा लोकांच्या मनातील ठाकरे कुटूंबा विषयी असलेली सहनुभूती दाखवतो. आदित्य ठाकरे हे मंत्री असतांना त्यांनी केलेल्या कार्यातून आपले कर्तुत्व सिध्द केले. त्यामुळेही अनेकांना पोटदुखी झाली. आगामी काळात होणार्या सर्व निवडणुकांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी सर्व पदाधिकार्यांनी आपल्या गावा-गावात जावून प्रयत्न करावेत, असे आवाहनही पेडणेकर यांनी केले.
माजी आमदार अनिल कदम म्हणाले की, कसलाही राजकीय वारसा नसणार्यांना जाती-धर्मापलीकडे विचार करुन बाळासाहेबांनी अनेकांना संधी दिली. त्यातून ते आमदार, खासदार, मंत्री झाले. काहींनी एवढे मिळवूनही पक्षाशी ईमानदारी बाळगली नाही. मिंधे गटाची वाट धरत खुद्द पक्षप्रमुख व पक्षालाच अडचणीत आणले. हे अत्यंत दुर्देवी आहे. अच्छे दिन येणार अशा भुलथापा दिल्या गेल्या. परंतु प्रत्यक्षात मात्र देशातील राज्यातील जनता वाढत्या महागाईने प्रचंड होरपळून निघत आहे. इंधनांची दर वाढ होत असल्याने सर्वांनाच त्याचा मोठा फटका बसत आहे. याकडे लक्ष न देता सत्ताधारी हे फक्त इतर पक्ष व संघटना संपवायास निघाली आहेत. या सर्व बाबींना सामान्य नागरिक अत्यंत कंटाळला असून आता तो फक्त निवडणुकांची वाट पाहत आहे. परंतु निवडणुका घेण्याची हिंमत या सरकारमध्ये उरलेली नसल्याचे दिसते.
यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सातत्याने सामान्य माणुस व शेतकरी, कष्टकरी यांचा विचार करुन त्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करण्यात येतो. नागरी प्रश्न, विजेचे प्रश्न, शेतकर्यांचे प्रश्नांवर भुमिका घेवून ते सोडविण्यासाठी मोर्चे, आंदोलने, निवेदने, दिंड्या काढून लक्ष वेधले जात आहे. शिवसेना सातत्याने लोकांसाठी संघर्ष करत असल्याने लोकांत या पक्षाविषयी अत्यंत चांगले मत आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकरी व सामान्यांच्या हितासाठी काम करण्याऐवजी धनदांडग्याच्या हिताचे निर्णय घेत आहे.
युवासेनेचे अंकित प्रभु म्हणाले की, ठाकरे नावाचा एक ब्रॅड असून त्याची कॉपी करण्यात येत आहे. परंतु ब्रँड हा ब्रॅड असतो. आज उद्या आणि पुढेही ठाकरे शिवाय पक्षाला पर्याय नसल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी शिवसेना पक्ष फुटीनंतर जिल्ह्यात सातत्याने पक्ष सदस्य नोंदणी, पदाधिकार्यांच्या नेमणुका, सामान्य नागरिक, शेतकर्यांचे प्रश्न घेवून पक्ष सातत्याने पुढे नेण्याचे प्रयत्न केल्याचे बोराडे यांनी सांगितले व शिवगर्जनानिमित्ताने जिल्ह्यातील शिवसैनिकांत अत्यंत चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, अंकुश पाचफुले, दुर्गेश काठोठीवाले, तालुकाप्रमुख हरिभाऊ पोहेकर, जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, कुंडलिक मुठ्ठे, अशोक बरडे, उध्दव मरकड, सुदर्शन सोळुंके,अजय अवचार, जिल्हा वैद्यकीय आघाडीचे डॉ. राजेश राऊत, किसान सेनेचे जिल्हा संघटक मुरलीधर थेटे, शहरसंघटक दिपक रणनवरे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष बालासाहेब आबुज, माजी नगरसेवक विजय पवार, संदीप नाईकवाडे, गणेश घुगे, जगन्नाथ चव्हाण, गंगुताई वानखेडे, देवनाथ जाधव,बंजारा सेलेचे शंकर जाधव, माजी जि.प.सदस्य कैलास चव्हाण, वैैलास पुंगळे, गणेश डोळस, बबनरा खरात, खालेद कुरेशी, प्रभाकर घडलिंग, सर्जेराव शेवाळे, उध्दव भुतेकर, प्रभाकर उगले, सखाराम गिराम, सखाराम इंगळे, परमेश्वर डोंगरे, राजु जाधव, संजय रत्नपारखे, सखावत पठाण, राजु सलामपुरे, बाळु काळे, बाबुराव कायंदे, किसन राठोड, अशोक हंडे, रामजी गायकवाड, विठ्ठलराव खरात, हरिभाऊ शेळके, संजय राठोड, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.