जालना । प्रतिनिधी – दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदीया यांना (दि 26) सीबीआय ने अटक केल्याबद्दल आम आदमी पार्टीने लोकशाहीचा काळा दिवस पाळून या अटकेच्या विरोधात केंद्र सरकारचा गांधी चमन येथे जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे यांच्या नेतृत्वात निषेध कार्यक्रम घेत केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. यावेळी संजोग हिवाळे सांगितले कि देशाच्या शिक्षण व्यवस्थेत बद्दल करून आम आदमी साठी दर्जेदार शिक्षण व्यवस्था निर्माण करणार्या व सरकारी शाळेच्या शिक्षणाबद्दल देशभरात आस्था निर्माण करणार्या क्रांतीकारी दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदीया यांनी दिल्ली सरकारमध्ये शिक्षण यंत्रणेमध्ये अमुलाग्र बदल घडवून एक देशापुढे शिक्षणा चे मॉडेल तयार केले आहे अशा नेत्यावर वारंवार सीबीआई इडीचा धाक दाखवून केंद्र सरकार स्वायत्त असणार्या संस्था मार्फत विरोधी पक्षातील सरकारवर दबाव तंत्र वापरत आहे. घटनेची पायमल्ली करून दडपशाहीचे धोरण अवलंबत आहे. केंद्र सरकार देशभरातील वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये विरोधात असलेले सरकारवर देखील स्वायत्त असणार्या संस्थामार्फत सरकार फोडण्याची आणि तोडण्याची नीतीचा अवलंब करीत आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना या पक्षाचे सरकार देखील होत्याचे नव्हते करून टाकले आहे या आणि अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या कृतीचा आणि या दडपशाहीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो तसेच केंद्र सरकारच्या या दडपशाहीच्या धोरणाला आम आदमी पार्टी कार्यकर्ते अजिबात घाबरणार नाहीत. महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुरमु यांना विनंती करण्यात येते की आपण या केंद्र सरकारच्या लोकशाही विरोधी कृत्याला पाय बंद करून दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया जी यांना मुक्त करावे अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तसेच जनतेच्या वतीने या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी मराठवाडा उप अध्यक्ष सुभाष देठे , तालुका अध्यक्ष सुभाष बोर्डे जालना , जिल्हा कोषाध्यक्ष रवी सुरवंशी , अमोल मिसाळ , विकास आदमने , सोमेश मिसाळ व ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.