भोकरदन शहरात एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न

10

भोकरदन । प्रतिनिधी – भोकरदन बस स्टँड या ठिकाणी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा जालना यांचे वतीने ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचालित शाहीर नानाभाऊ परिहार आणि संच यांचे पारंपारिक शाहिरी कलापतकातून एड्स होण्याची कारणे त्याचप्रमाणे न होण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच संसर्गित रुग्णासाठी सामाजिक दिलासा व गुप्त रोगाची कारणे त्यावर उपाय, अशा विविध विषयावर सविस्तर आपल्या शाहिरी लोककला पथकातून सर्वांना कळेल असा कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली, प्रत्येक ठिकाणी शाहीर नानाभाऊ परिहार यांच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे, त्यांचे सोबत शिवाजी पवार, भगवान ढवळे, आबाराव लाखे, गजानन काकडे, त्र्यंबक सोळंके हे सहकारी कलाकार सात संगत करत आहेत, त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथील समुपदेशक श्रीमती अरुणा झीने महादू सुरडकर तसेच अनेक बाहेर गावचे प्रवासी कार्यक्रमाला उपस्थित होते.