प्रभाग क्रमांक 23 मधुबन कॉलनी येथे आधुनिक छताची उभारणी

20

जालना । प्रतिनिधी- शहरातील प्रभाग क्र 23 मधील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन येथील माजी नगरसेवक सौ. संध्या संजय देठे यांच्या प्रयत्नातून सहा लक्ष रुपये खर्च करून मधुबन कॉलनी येथील महिलांसाठी उभारण्यात आलेल्या योद्धा खुली व्यायाम शाळेत आधुनिक छताची उभारणी करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे, भास्कर दानवे, राजेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील माजी नगरसेवक सौ संध्या देठे यांच्या मागणीवरून ठोक वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत सहा लक्ष रुपये खर्च करून जालना शहरात प्रथमच मधुबन कॉलनी येथील महिलांसाठी उभारण्यात आलेल्या योद्धा खुली व्यायाम शाळेत भव्य आधुनिक छताची उभारणी करण्यात आली आहे, या मुळे जालना शहराच्या विकासात भर पडली आहे, पुढील काळात प्रभागात नागरिकांच्या मागणीवरून केंद्रीय मंत्री खा रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाने व प्रयत्नाने विविध ठिकाणी खुल्या व्यायाम शाळा व छताची निर्मिती करून प्रभागातील विकास करण्यात येणार असल्याचे सौ संध्या देठे यांनी सांगितले आहे,
या उपक्रमाबद्दल प्रभागातील नागरिकाकडून समाधान व्यक्त करतांनाच सौ. देठे यांचे कौतुक केल्या जात आहे.