जालना । प्रतिनिधी – जालना वकील संघात शनिवार (दि 25) रोजी ई-फाईलीग करण्यासाठी कार्याशाळाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा वकीलांना ई-फाईलीग साठी होणा-या अडचणी लक्षात घेता व ती सुलभ करण्यासाठीच आयोजन करण्यात आलेली होती. या कार्याशाळासाठी मार्गदर्शक म्हणून मास्टर ट्रेनर अॅड. एम. एस. धन्नावत, अॅड. वरून देशपांडे, ड. बॉबी अग्रवाल व न्यायाधिश मंडळी उपस्थित होती.
जिल्हा प्रधान न्यायाधिश श्रीमती व्ही. एम. मोहिते मॅडम यांचा प्रयत्नानी सदर कार्यशाळा यशस्वी झाली, जिल्हा न्यायाधिश श्रीमती ए.डी. देव यांनी प्रतिपादन केले की, नवीन तंत्रज्ञान स्विकारून त्याचा सोबत कार्य करणे फायदेशिर होते या प्रणालीमुळे भविष्यात वकिली व्यवसाय सोयीस्कर होईल.
अॅड. राम गव्हाणे, अध्यक्ष जालना जिल्हा वकील संघ, उपध्याक्ष अॅड. परमेश्वर गडगिळे, अॅड. लक्ष्मन उढाण, जिल्हा सरकारी वकील अॅड. बाबासाहेब इंगळे व्यासपिठावर उपस्थित होते. अॅड. राम गव्हाणे यांनी वकीलांना आव्हान केले की, ई-प्रणाली वापरावी, येणारी अडचण दूर करण्यासाठी भविष्यात पुन्हा कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. अॅड. लक्ष्मन उडान यांनी प्रतिपादन केले की, वकीलांना कमी व्याज दारात कम्प्युटर व प्रिंटर उपलब्ध करून देण्यासाठी बार कान्सिल कडे पाठ-पुरवठा केला जाईल. सदर कार्यक्रमात सुत्र सचालन उपध्याक्ष अॅड. परमेश्वर गडगिळे यांनी केले तर न्यायलिन सगंनक विभाग प्रमुख श्री. महेश देशमुख यांनी सुध्दा वकीलांचा प्रश्नाचे उत्तर दिले. या कार्याशाळाला सर्व जिल्हा व तालुका येथील विधिज्ञानी मोठया संख्याने उपस्थिती दर्शविली. अशी माहिती अॅड. अरविंद मुरमे यांनी दिली.