पोहरादेवीच्या विकासासाठी 590 कोटींची तरतूद – आ. लोणीकर

14

जालना । प्रतिनिधी – पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी असून तिरुमला तिरुपती देवस्थान व पंढरपूर या तीर्थक्षेत्रावरील झालेल्या विकासासारखा विकास हा पोहरादेवी येथे व्हावा या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाचशे नव्वद रुपये विकास निधी जाहीर करून उपलब्ध करून दिला आहे.
क्रांतीसिंह संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. शूरवीर लढवय्या गोरराजवंशी बंजारा समाजातील प्रख्यात सद्गुरु होते. ते अखंड हिंदुस्थानातील हिंदूंचं आराध्य दैवत आहे संत सेवालाल महाराजांची कृपा आणि रामराव बापू महाराजांच्या आशीर्वादाने गेली 35 वर्ष मी राजकारणात टिकून आहे. असे प्रतिपादन वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री सन्माननीय आमदार बबनराव लोणीकर साहेबांनी परतूर येथे आयोजित संत सेवालाल महाराजांच्या सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त पदयात्रेत बोलताना केले. पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की कोरोना काळानंतर पहिल्यांदाच गावगाड्यातील तांड्यावर वाडी वस्तीवर गावागावात आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रांतिसिंह संत सेवालाल महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी झाली असून. दरवर्षी शिवजयंती प्रमाणे देशभरात मोठ्या प्रमानात सर्व राज्याच्या काना कोपर्‍यात तांडा वाडी वस्तीवर शिवजयंती उत्सव सोहळ्याप्रमाणेच हा उत्सव सोहळा साजरा झाला पाहिजे.
या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर जिजाबाई जाधव, पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात पंचायत समिती सदस्य अर्जुन राठोड शत्रुघ्न कनसे, नगरसेवक सुधाकर सातोनकर संदीप बाहेकर अर्जुन नायक राठोड रमेश राठोड सिताराम राठोड प्रकाशराव चव्हाण कृष्ण अरगडे प्राध्यापक प्रमोद राठोड कैलास चव्हाण अजय चव्हाण निर्धास्त राठोड गणेश राठोड, शुभम आडे, दिलीप राठोड, बाबू राठोड, अविनाश राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधवांची महिलांची उपस्थिती होती.