जालना । प्रतिनिधी – राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधत येथील डेबुजी समाज परिवारातील सदस्यांनी काल गुरुवारी जालना शहरातील अमरधाम स्मशानभूमीत (शेरी) स्वच्छ्ता मोहिमेसह अंत्यसंस्कारासाठी असलेल्या ओट्यांची दुरुस्ती,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,वृक्षारोपण आदी स्तुत्य उपक्रम राबवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने गाडगे बाबा यांची जयंती साजरी केली.एरवी स्मशान भूमीत सर्वच जण केवळ अंत्यसंस्काराच्या वेळी जात असतात.शहरातील परिट समाजाच्या ज्येष्ठ नागरिक आणि जेपीसी बँकेचे व्हॉईस चेअरमन सुभाषराव वाघमारे यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई जगन्नाथराव वाघमारे यांचे मागील काही दिवसांपूर्वी निधन झाले.त्यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जालना जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि आणि सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेले परिट समाजाचे सक्रिय पदाधिकारी किशोर खंडाळे(गुरुजी) यांनी स्मशान भूमीतील दुरावस्था डोळ्यात हेरली आणि त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी असलेल्या ओट्यांची दुरुस्तीसह अन्य उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव समाज बांधवांसमोर ठेवला.उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याने समाज बांधवांनी देखील त्यांच्या या प्रस्तावास तात्काळ होकार देऊन यथाशक्ती आर्थिक मदत दिली.या जमा झालेल्या रकमेतून अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी असलेल्या सहा ओट्यांची विट बांधकाम करून पूर्णतः दुरुस्ती करण्यात आली असून स्मशानभूमी परिसरात स्वच्छ्ता मोहीम राबवत कचरामुक्त केली.याशिवाय तेथे विविध प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणार्या व्यक्तीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून 1 हजार लिटर क्षमतेची टाकी पूर्ण सुविधांसह बसवण्यात आली.समाज बांधवांसह युवकांनी देखील या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून एक आगळा वेगळा उपक्रम यशस्वीपणे राबवून इतरांसमोर नवीन आदर्श उभा केला आहे.
गोरगरिबांना अन्नदान आणि स्वच्छ्ता दुतांचा गौरव
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी अशी दशसुत्री राबवत गोरगरिबांना त्याकाळी आधार दिला.त्यांच्या या दशसूत्रीची प्रत्यक्ष अमलबजावणी करत जालना जिल्हा परिट धोबी सेवा मंडळ आणि डेबुजी परिवार सदस्य यांनी जालना शहरातील बेघर निवारा केंद्र,रेल्वेस्टेशन, मंमादेवी मंदिर आणि पंचमुखी महादेव मंदिर परिसरात असलेल्या गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. तसेच यावेळी कदिरभाई पठाण,अशोक वाघमारे,रामदास उघारे,योगेश आटोळे,विनोद आटोळे यांचा स्वच्छ्ता दुत म्हणून शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाचे उपाध्यक्ष मोहनराव इंगळे,जिल्हाध्यक्ष किशोर आगळे,मराठा परीट समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष सुभाषराव वाघमारे,अनिलराव खंडाळे, गणेशराव इंगळे,अशोकराव जाधव,बाबुलाल राऊत,काशिनाथ मेव्हणकर,सुभाषराव घोडके,संतोष शिंदे,गणेश मेव्हणकर,कैलास वाघमारे,गजानन वाघ,अतुल खंडाळे,शंकर काळे,संजय शेलार,सुधाकर काळे,रामकिसन वाघ,दत्ता जाधव,संजय पैठणकर,वसंतराव राऊत,प्रविण वाघमारे,मनीष जाधव,संजय आगळे,गणेश वाघमारे,सुदेश वाघमारे,कृष्णा इंगळे,दिगंबर जाधव,रोषन इंगळे,राहुल वाघमारे,विवेक पाटील,अजय खंडाळे,सिद्धार्थ वाघमारे,सोमेश आगळे,रामकिसन मोरे,सौ.लताबाई मेव्हणकर, श्रीमती वंदना इंगळे,सौ.वैशाली इंगळे,सौ.रेणुका इंगळे आदींची उपस्थीती होती.