माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते परतुर तालुक्यातील पिंपरी धामणगाव व संकनपुरी येथे 07 कोटी रुपयांच्या डांबरीकरणाच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

61

विकास कामे करून दाखवणे येड्या गबाळ्याचे काम नव्हे
– माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

गेल्या पंधरा दिवसात मतदार संघात 52 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन
====================
नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मतदार संघात अनेक विकास कामे आणली
====================
आपल्या बाजूच्या घनसावंगी मतदारसंघात मी मंत्री असताना 1100 कोटी रुपयांची रस्ते बांधले
====================
पिंपळी धामणगाव ते कोकाटे हादगाव, दिंडी मार्ग ते संकनपूरी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन
====================
प्रतिनिधी
विकास करून दाखवणे हे येड्या गबळ्या चे काम नसून, त्यासाठी सर्वसामान्य विषयी आस्था असावी लागते असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
ते धामणगाव ते कोकाटे हदगाव शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग ते संकनपुरी रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसापासून परतूर विधानसभा मतदारसंघातील 52 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले असून विकासासाठी आपण कधीच तडजोड केली नाही असे सांगताना, गेल्या सहा महिन्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर भाऊ मुनगंटीवार पंकजाताई मुंडे, यांच्या माध्यमातून मतदार संघाच्या विकासासाठी आपण चार हजार सातशे कोटी रुपयांचा निधी आणला होता या निधीच्या माध्यमातून मतदार संघामध्ये रस्त्याचे जाळे विणले गावाला जोडणारे सर्व रस्ते जोडल्या गेल्यामुळे येथील दळणवळणाचा प्रश्न, सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम दिला. आपल्या बाजूच्या मतदारसंघात म्हणजेच घनसांगी तालुक्यातील मंत्रीपदाच्या काळामध्ये अकराशे कोटी रुपयांची रस्ते बांधण्याचे काम आपण केली असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांमध्ये परतुर विधानसभा मतदारसंघ साठी नाबार्ड मुख्यमंत्री ग्रामसडक योजना वैशिष्ट्यपूर्ण योजना जिल्हा नियोजन मंडळ या माध्यमातून 500 कोटी रुपयांचा निधी आणला असून येणाऱ्या काळातील सिंचनासाठी बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती या शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक कामे प्रस्तावित केले असून लवकरच यांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती यावेळी बोलताना आमदार लोणीकर यांनी दिली
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की पांडुरंगाच्या कृपेने मला सर्वसामान्य जनतेची सेवा करता आली गेली पस्तीस वर्षे मी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत आलो, म्हणून मी राजकारणात टिकून असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
यावेळी कार्यक्रमाला रंगनाथ येवले, रामप्रसाद थोरात,सुदाम प्रधान, मधुकर मोरे, सिद्धेश्वर सोळंके तुकाराम सोळंके गजानन लोणीकर, गंगाधर ढवळे विजय ढवळे संतोष ढवळे ,भगवानराव ढवळे, बबलू सातपुते रवी सोळंके, भीमराव राठोड,विलास चव्हाण शिवाजी कोरडे गंगाधर सुपेकर अनिलराव भापकर अशोक भांडवले बंडू हंबाडे महादेव सुभेदार जालिंदर घुमरे नरहरी टाक धर्मराज सुपेकर निळकंठ चौधरी, दत्ता कोरडे पांडुरंग थोरात शिंदे बाबुराव शिंदे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती