काँग्रेसचे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

46

जालना । शासनाने अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती १ ली ते ८ वी पर्यंत कायम स्वरूपी बंद केली आहे. त्याच्या निषेधार्थ जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि. ०२) शुक्रवारी रोजी दुपारी २.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कॉग्रेस सेवा दलाच्या व काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध अल्पसंख्यांक सामाजिक संघटना, पालक वर्ग, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या पाठिंब्याने उतरणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल रफिक अ. रशिद, जिल्हा समन्वयक बाबासाहेब सोनवणे यांनी केले आहे.