जालना । पावरलूम औद्योगिक वसाहत परिसरात दहा फूट लांबीचा अजगर आढळून आला असून सर्पमित्रांनी त्यास शिताफिने पकडून वनविभागाच्या सहकार्याने जंगलात सोडले .
पावरलूम परिसरात रविवारी ( ता. 27) मध्यरात्री अजगर असल्याची माहिती गणेश मोहिते व शिवाजी डाखोरकर यांनी सर्पमित्रांना कळवली. माहिती मिळताच सर्पमित्र विशाल गायकवाड, अजय नवगिरे ,गोकुळ लाड, व रामेश्वर शहा यांनी पॉवरलूम परिसरात धाव घेतली. मोठ्या शिताफीने 10 फूट लांब व 18 किलो वजनी असलेल्या अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाच्या स्वाधीन यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अभिमन्यू खलसे, वनपाल सतीश बुरकुले, वनरक्षक बिरप्पा पाटील, वन कामगार भाटसोडे, अविनाश पगारे यांच्या सहकार्याने जंगलात सुरक्षित सोडण्यात आले. दरम्यान जालना शहर, ग्रामीण भागात कुठेही अजगर, साप, आढळून आल्यास 7776092467,952 7570005, 7887696936 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वनविभाग व सर्पमित्रांनी केले आहे.