मुद्रातर्फे बुधवारी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण, आणि कविसंमेलन

साहित्यिक उपक्रम: आ. कैलास गोरंट्याल, हेरंब कुलकर्णी यांची उपस्थिती

35

जालना । येथील मुद्रा साहित्य सेवा संस्थेच्या वतीने नोव्हेंबर महिन्यातील महामानवांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण दिनांचे औचित्य साधत ‘जागृती दिन ‘ म्हणून बुधवारी ( ता. 30) राज्यस्तरीय पुरस्कार वितरण ,व कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मुद्रा चे संस्थापक कवी कैलास भाले यांनी दिली.

सोहळ्या विषयी माहिती देतांना कैलास भाले यांनी सांगितले, नोव्हेंबर महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, संविधान दिन आणि म. जोतीराव फुले स्मृती दिन या तीन दिनानिमित्त उपक्रम राबवले जातात. तथापि मुद्रा संस्थेच्या वतीने मागील दोन वर्षांपासून आदर्श विधीज्ञ, शिक्षकांचा सत्कार केला जातो. यंदा बुधवारी( ता. 30) सायंकाळी 06.00 वा. टाउनहॉल स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन होईल .अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका रसना देहेडकर ह्या तर प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड हे राहतील. शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहेत. डॉ. राजेंद्र गाडेकर, रवींद्र अंभोरे,महेंद्र अंभोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर विशाल इंगोले ( लोणार) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून कवी हबीब भंडारे ( औरंगाबाद), डॉ . सुहास सदाव्रते ,डॉ. शशीकांत पाटील, गणेश खरात, डॉ. प्रभाकर शेळके, विनोद जैतमहाल, डॉ. गणेश कंटुले, प्रदीप इक्कर, शब्बीर शेख ( सिल्लोड), सुनील उबाळे ( औरंगाबाद), मनिष पाटील, शिवाजी तेलंगे, राधिका वैष्णव, रत्नमाला मोहिते, छाया वाघ, मोहिते, डॉ. दिगंबर दाते, ह्यांच्या कविता सादर होतील. तरी या देखण्या सोहळ्यास रसिक व जालनेकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन कवी कैलास भाले,रमेश देहेडकर,सुनील लोणकर, प्रा. पंढरीनाथ सारके,सुधाकर वाहुळे, सुरेखा गाडेकर, विमल कांबळे, शांतीलाल बनसोडे,इलियास मोहियोद्दीन, नवनाथ लोखंडे, बंडु काळे, राजेंद्र जाधव, रामा सुपारकर, इंजि. संजय कसबे,
डॉ. सुरेश गरुड,प्रा. चारुशीला दाभाडकर, प्रा. कृष्णा कदम, दीपक क्षीरसागर, गीता खैरे, मिलिंद घोरपडे ,लक्ष्मीकांत दाभाडकर, विठ्ठल वरपे, वसंत सूर्यवंशी, विपुल धोत्रे, अनिकेत वैष्णव, डॉ. दिगंबर दाते,प्रा. ज्योती पोहेकर,प्रा. किरण सावले आदींनी केले आहे.

पुरस्कारांचे मानकरी….!

मुद्रा साहित्य पुरस्कार : डॉ. सुशील चंदनशिवे (कोल्हापूर), आदर्श विधीज्ञ : ॲड. विंदा महाजन ( पुणे), आदर्श शिक्षक: जालिंदर लाड ( नजिक पांगरी) यांना पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.